shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ तात्काळ कार्यान्वीत करा या मागणीसाठी


दि.३० सप्टेंबर रोजी आझाद मैदान मुंबईत
सकल नाभिक समाजाचे महाधरणे आंदोलन

बीड / प्रतिनिधी:
नाभिक समाजासाठीचे संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वीत करा या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रतील सकल नाभिक समाज सोमवार दि.३० सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई येथील आझाद मैदान याठिकाणी एकदिवसीय राज्यव्यापी महाधरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेणार असल्याची माहिती किरण भांगे यांनी दिली.

        शासनाकडे दिलेल्या निवेदनात केशशिल्पी महामंडळास १०००/- कोटी रुपयांचा निधी द्यावा, उपकंपनीचे मुंबई मुख्यालयातील बारा प्रशासकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी शासनाने जाहिरात काढावी व संचालक मंडळातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, शासकीय सदस्य यांच्या निवडी कराव्यात, थेट कर्ज योजनेतील सिबिल व जामीनदारांची जाचक अट शिथिल करावी, उपकंपनीचे लेटरहेड, कार्यालय, माहितीपत्रक यांचेवर सेना महाराजांचा फोटो वापरावा या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत.
          १३ सप्टेंबर २०१९ रोजी स्थापन केलेले केशकला बोर्ड अग्रेषित करून दि.०५ जानेवारी २०२४ रोजी ओबीसी महामंडळाची उपकंपनी कऱण्यात आलेली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाठी निधीची तरतूद केलेले आहे,परंतु कोणतीही अद्याप पुढील कार्यवाही झालेली नाही. 
त्यामुळे शासनाने ५ वर्षात समाजाला फक्त आश्वासनांचे गाजर दाखवून फसवणूक केली असल्याची भावना नाभिक समाजाची झाले आहे. म्हणून महाराष्ट्रातील विविध संघटना एकत्र आल्या असल्याचे प्रसिद्धस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार सुनिल पोपळे - बीड
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
close