shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

कोल्हार भगवतीपूर येथे भव्य ग्रंथ (पुस्तक) मेळावा संपन्न


अजिजभाई शेख / राहाता 
राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथे पंचायत समिती शिक्षण विभाग, गट साधन केंद्र, राहाता, राहाता तालुकास्तरीय महावाचन उत्सव अंतर्गत ग्रंथ प्रदर्शन २०२४ भव्य पुस्तक मेळावा जिल्हा परिषद मराठी शाळेच्या सभागृहामध्ये प्रसिद्ध लेखक प्राध्यापक शशिकांत शिंदे सर यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबराव अनाप सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भगवतीपूर कोल्हार हे होते, सूत्रसंचलन लक्ष्मण उगलमुगले सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी श्री. कांबळे यांनी केले.
सदर कार्यक्रमास राहाता तालुक्यातील मुख्याध्यापक व कोल्हार केंद्रातील सर्व शाळांचे विद्यार्थी हजर होते. या पुस्तक मेळाव्या मध्ये डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम उर्दू लायब्ररी अँड स्टडी सेंटर कोल्हार भगवतीपूरची उर्दू, मराठी, हिंदी, इग्रजी भाषेतील पुस्तके मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आली होती. जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा, न्यू चांद सुलताना उर्दू हायस्कूल, भगवती माता विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार या शाळांनीही मेळाव्यात पुस्तके ठेवली होती. कार्यक्रमास प्रा.श्री शिंदे सर, शिक्षण विस्तार अधिकारी श्री कांबळे साहेब, केंद्र प्रमुख श्री कोळेकर साहेब, ज्येष्ठ शिक्षक श्री. कैलास चिंधे सर,पत्रकार राजमोहंमद शेख सर, मुख्याध्यापक श्री अनाप सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा.श्री.शशिकांत शिंदे सर यांनी अनेक कविता सादर करून मुलांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमास न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रिन्सिपॉल श्रीमती आंधळे मॅडम, तसेच शिक्षक, भगवती माता विद्यालयाचे शिक्षक, न्यू चांद सुलताना उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक मोहंमद समी सर, जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका नसरीनबाजी, ममदापूर उर्दु चे मुख्याध्यापक अनिस सर,
कोल्हार केंद्रातील मुख्याध्यापक शिक्षक व आदी मान्यवर मोठ्या संख्येने हजर होते. 
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विस्तार अधिकारी श्री.कांबळे साहेब, केंद्र प्रमुख श्री.कोळेकर साहेब, मुख्याध्यापक श्री अनाप सर,श्री.बशीर सर, श्री केदारे सर, पत्रकार राजमोहंमद शेख, श्रीमती संगीता भुसाळ मॅडम, श्रीमती कुळधरण मॅडम, श्रीमती पठारे मॅडम, श्रीमती सुंबे मॅडम, श्रीमती देशपांडे मॅडम, श्रीमती नाईक मॅडम,श्री महाले सर, श्री सोहेल शेख सर, तब्बसूम बाजी, इलियास सर,परवीन बाजी, समीना बाजी, नसरीन बाजी, सिराज सर,आदींचे सहकार्य लाभले.

*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
close