*श्रीरामपूर येथील विविध पुरोगामी पक्ष, संघटना शिष्टमंडळाचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना निवेदन*
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर नंतर आता श्रीरामपूरात धार्मिक दंगली घडवून आणण्याचा समाजकंटकांच्या प्रयत्नांना कदापि सहन केले जाणार नाही, ही भूमिका घेत आज सामाजिक सौहार्द बिघडवणाऱ्या, हेट स्पीच देणाऱ्या व्यक्ती व कार्यक्रमांना पायबंद घालावा अशी मागणी श्रीरामपूर येथील विविध पुरोगामी पक्ष, संघटनांच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न अत्यंत नीच प्रवृत्तीचा आहे, सार्वजनिक वातावरण दूषित करून धार्मिक तेढ निर्माण होईल अश्या कार्यक्रमाला बंदी लवकरात लवकर घातली पाहिजे, यासाठी आम्ही सर्वच आग्रही आहोत. येणाऱ्या काळात श्रीरामपूरमधील सर्वच नागरिक सार्वजनिक हित आणि शांततेत राहण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
शिष्टमंडळात ऍड.राजेश बोर्ड पाटील, लकी सेठी (राष्ट्रवादी काँग्रेस, एस.पी) डॉ. वसंत जमधडे (विचार जागर मंच) जीवन सुरुडे, शरद संसारे (लाल निशाण पक्ष)
डॉ.सलीम शेख,अशोकराव दिवे, (विद्रोही सांस्कृतीक चळवळ) डॉ.जालिंदर घिंगे (विद्रोही सांस्कृतीक चळवळ/ वंचित बहुजन आघाडी) किशोर संचेती (जैन समाज संघटना) सुनील वाघमारे, सागर खरात (वंचित बहुजन आघाडी) कुमार भिंगारे, अमोल सोनवणे (विद्रोही विद्यार्थी संघटना) फ्रान्सिस शेळके, (भारत मुक्ती मोर्चा) धनंजय कानगुडे (सामजिक कार्यकर्ते), एस. के. बागुल (बामसेफ) आदी मान्यवर यात सहभागी आहेत.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११