shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

धनगर समाजाच्या वतीने रेडणी येथे करण्यात आला रस्ता रोखो.

धनगर समाजाच्या वतीने रेडणी येथे करण्यात आला रस्ता रोखो. 
इंदापूर दि.२३ सप्टेंबर २०२४ रोजी रेडणी येथे धनगर समाजाला एसटी आरक्षण अंमलबजावणी करावी व पंढरपूर येथे उपोषणास बसलेल्या बांधवांना पाठींबा दर्शवण्यासाठी बारामती बावडा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन धनगर समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला . 
यावेळी अनिताताई खरात म्हणाल्या की,  माझे बांधव आज १५ दिवस झालं उपोषण करतात. तरी सरकार त्याची दखल घेत नाही. सरकारने याचा विचार करावा  आणि जर ते जमत नसेल तर सरकारनी तसे जाहीर  करावे आणि यात सरकार जर जाणून बजून वेळ काढू पणा करत असेल तर त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल.  आता माझे धनगर युवक शांत बसणार नाहीत याचा विचार सरकारनं करावा. 

यावेळी सुभाष पाटील , तरंगे,तानाजी हेगडकर, यांची भाषणे झाली.
तसेच यावेळी दिलीप वाघमोडे, पिनू बंडगर, सुनील कोकरे, हनुमंत कुलाल व मोठया प्रमाणात धनगर समाज बांधव उपस्थित होते. याप्रसंगी प्रशासनास निवेदन देण्यात आले.
close