"जय बजरंग जय वडार" हा नारा देऊन सकल महाराष्ट्रीयन वडार समाजाला एकत्र जोडून महाराष्ट्रीयन राजसत्तेसमोर वडारांची ताकद दाखवणारा दूरदृष्टीचा , पुरोगामी विचारांचा , वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा , तरीही अशिक्षित , अज्ञानी , अंधश्रद्ध , भटका , श्रद्धाळू अशा मागास वडार समाजाला जोडणारा नेता आपल्यातून नुकताच निवर्तला आहे . दिवंगत डॉक्टर लक्ष्मणराव देगलूरकर यांच्या रूपाने महाराष्ट्रीयन वडार समाजाने एक झंझावात अनुभवाला होता .
वर्षानुवर्षे वडार समाज ज्या ST कॅटेगरी ची मागणी करत होता , ती मागणी 1994 लाच राज्य शासनाला मान्य करायला भाग पाडणारा हा नेता अत्यंत कडक शिस्तीचा व तात्त्विक होता . . . आपल्या प्राचीन व पुरातन संस्कृती बद्दल त्यांना अतीव आदर होता . आपले मूळ हे ओड संस्कृतीत आहे व आज जरी गाडी वडार , माती वडार , दगडी वडार , पाथरवट हे भेद असले तरी आपण सर्व मूळचे ओड आहोत व एकच आहोत , याच विचारांनी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व वडार जोडला .
*ओड म्हणजेच वडार व वडार समाजाबद्दल असलेले अत्यंत जिव्हाळ्याचे प्रेम , आसक्ती म्हणजेच समाजबद्दलची ओढ* म्हणजेच वडार समाजाच्या प्रगतीची लागलेली ओढ . . .असा एक ढोबळ अर्थ डॉ देगलूरकर यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तक *ओड आणि ओढ* याबद्दल करता येईल .
पुस्तक बाजारात आल्यानंतर , प्रकाशित झाल्यानंतर, याचे अनेक अन्वयार्थ लावले जातील .
गेल्या काही वर्षांत आपण व डॉ देगलूरकर सामाजिक दृष्टीने , वैचारिक दृष्टीने खूप जवळ आलो होतो , भविष्यातील कल्पना ते व्यक्त करत असत , समाजाचा आरक्षणाचा प्रश्न कसा मिटेल याबद्दल त्यांची काही मते ठाम होती . . .कदाचित यावर त्यांच्या पुस्तकात काही मार्गदर्शन असेल .
*ओड आणि ओढ* या पुस्तकाबद्दल एक आतुरता निर्माण झाली आहे , भावनिकरित्या या पुस्तकाशी जुडले गेलो आहोत . पुस्तक प्रकाशक आपले मित्रच आहेत ,त्यामुळे हे पुस्तक सर्वदूर व प्रत्येक वडार समाज बांधवाकडे असावे अशी किरकोळ अपेक्षा व्यक्त करतो व या पुस्तकाच्या रूपाने डॉक्टर पुन्हा एकदा घराघरात पोहोचोत अशी भावना व्यक्त करतो !
पुस्तक प्रकाशन सोहळ्याला खूप खूप शुभेच्छा* !
*अमर कुसाळकर
*श्री वसंत शिंदे