लियाकतखान पठाण, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील कु. श्रेया संदीप जाधव इयत्ता चौथी हिने कासारा दुमाला येथे दिनांक ३ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्य सेनानी व आदिवासी श्रमिकांचे नेते साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृती प्रित्यर्थ मानव विकास संस्था संचलित श्री काशेश्वर माध्यमिक विद्यालय कासारा दुमाला या ठिकाणी झालेल्या वकृत्व स्पर्धेत बाल गटात संगमनेर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. कु.श्रेया हिने मिळवलेल्या या यशाबद्दल गटविकास अधिकारीअनिल नागणे, गटशिक्षणाधिकारी श्री.गुंड विस्तार अधिकारी श्री.भांगरे केंद्रप्रमुख श्रीमती वलवे मॅडम,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व समिती गावचे सरपंच, उपसरपंच,सर्व सदस्य, ग्रामस्थ, पालक, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
या विद्यार्थिनीला मुख्याध्यापक श्रीमती आरोटे मॅडम, वर्ग शिक्षक श्री. गडाख सर व श्रीमती घोटेकर मॅडम तसेच आई- वडील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११