अजीजभाई शेख / राहाता:
तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आसिया अकील शेख हिची नुकतीच रायगड पोलीस दलात निवड झाली आहे. तिच्या या निवडीप्रित्यर्थ प्रवरानगर येथील ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
अतिशय अभ्यासू आणि कष्टाळू आसियाने कौटुंबिक हलाखीच्या परिस्थितीत स्वतःच्या जिद्दवर मेहनत करून यश संपादन केले आहे. तिचे वडील प्रवरानगर येथे रिक्षा चालक आहेत. महात्मा गांधी संकुलाच्या वतीने उपप्राचार्य अलका आहेर, डॉ. शरद दुधाट, वर्गशिक्षक जवाहरलाल पांडे, ज्ञानदेव दवंगे यांच्या हस्ते तिचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
तिच्या या निवडीबद्दल रावसाहेब म्हस्के, उपाध्यक्ष अरुण कडू, एकनाथराव घोगरे, माजी प्राचार्य बी.जी. आंधळे, प्राचार्य अंगद काकडे, मुख्याध्यापिका सिंधू क्षेत्रे, प्र. पर्यवेक्षक संजय ठाकरे, प्र. पर्यवेक्षक सुभाष भुसाळ, बाबासाहेब अंत्रे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११