*क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश: पळसनाथ विद्यालयाची खो-खो स्पर्धेसाठी जिल्हा पातळीवर निवड*
आप्पासाहेब यमपुरे
पळसदेव दि:१० क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने,इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील श्री केतकेश्वर विद्यालयात दि. 3 ते 5 सप्टेंबर या कालावधीत तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा पार पडल्या असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक यांनी दिली.
तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये पळसनाथ विद्यालयाच्या मुलींनी बाजी मारली.तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत 14 /16 /19 वर्षे वयोगटातील मुला मुलींचे एकूण 164 संघ सहभागी झाले होते. 19 वर्षीय वयोगटातील मुलींच्या अंतिम खो-खो च्या सामन्यात पळसनाथ विद्यालयाच्या 19 वर्षीय वयोगटाच्या मुलींच्या संघाने श्री.शिवाजी विद्यालय बावडा मुलींच्या संघावर पाच गुणांनी विजय मिळवत या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.
शालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी पळसनाथ विद्यालयाची जिल्हा पातळीवर मुलींच्या संघाची निवड झाली. सर्व यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक सिकंदर देशमुख,नितीन जगदाळे,सुवर्णा नाईकवाडी,रामचंद्र वाघमोडे,यांचे पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे,सचिव योगीराज काळे,खजिनदार बबन आबा काळे संस्थेचे सर्व पदाधिकारी विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक पर्यवेक्षक संजय जाधव यांनी अभिनंदन करत कौतुक केले.