एरंडोल (प्रतिनिधी) येथील आपले सरकार केंद्रावर ऑनलाईन पोर्टलवर एरंडोल शहर व्हिलेजमध्ये दिसत नसल्याने जनतेची गैरसोय होत आहे. त्यामुळे एरंडोल शहर व्हिलेजमध्ये समाविष्ट करण्यात यावे अशा आशयाच्या मागणीचे निवेदन माजी नगराध्यक्ष राजेंद्र दोधू चौधरी यांनी जिल्हाधिकारींना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की ऑनलाईन पोर्टल वर तक्रार करणेसाठी एरंडोल शहरवासियांना सरकार केंद्रावर आपले एरंडोल शहर हे नांव व्हिलेजमध्ये दिसत नसल्याने शहरातील नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे जनतेची गैरसोय होत आहे. तरी आपल्या स्तरावरून आपले सरकार ऑनलाईन पोर्टलवर व्हिलेजमध्ये एरंडोल शहर हे नाव समाविष्ट करणेत यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली पोर्टलवर आहे.