एरंडोल :-डॉ.श्री.नानासाहेब तथा नारायण विष्णु धर्माधिकारी प्रतिष्ठाण रेवदंडा ता.अलीबाग जिल्हा रायगड या प्रतिष्ठाण मार्फत एरंडोल शहरात अनंत चर्तुदशीच्या दिवशी सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन करतांना सेवाभक्तीतून निर्माल्य संकलनाचा कार्यक्रम एरंडोलचे प्रांताधिकारी आदरणीय मनिषकुमार गायकवाड सोहब यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमास एरंडोल नगरीचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री रमेशभाऊ परदेशी यांची उपस्थिती लाभली.
प्रतिष्ठाण मार्फत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहीती घेवून उपक्रमाचे कौतुक व निर्मल्य संकलन पर्यावरण पूरक आहे.येथे येऊन मनस्वी आनंद व्यक्त होत आहे.तसेच सर्वांचे मनापासून आभार.
श्रीमान मनिषकुमार गायकवाड, प्रांताधिकारी.
डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांचा उपक्रम:वृक्ष लागवड व संवर्धनाअंतर्गत 'निमल्यापासून कंपोस्ट खत निर्मिती अभियान. पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी आदरणीय डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा यांच्या वतीने पद्मश्री डॉ.श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली श्री बैठकीच्या माध्यमातून सामाजिक व पर्यावरण पूरक असे विविध उपक्रम जिल्हा, राज्य तसेच देशपातळीवर राबविले जातात.त्याच्याच एक भाग म्हणून गणेशोत्सवातअकरा दिवसाच्या गणपती विसर्जना दरम्यान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निर्माल्य ठिकठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतां मध्ये टाकले जाते. यामुळे ते वाया जाऊन पाणी खराब होते. त्यामुळे असे निर्माल्य आडगाव,कासोदा,तळई खडके,भातखेडा, एरंडोल,टोळी,पिंप्री,गिताई पार्क इ. वेगवेगळ्या ठिकाणी निर्माल्य कलश ठेवून जवळपास २२५ प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांद्ववारे एकत्रित संकलित केले. संकलित केलेल्या 5 टन 80 किलो निर्माल्या पासून कंपोस्ट खताची निर्मिती करण्यात येणार आहे.
अशाप्रकारे पर्यावरण पूरक अभियानातून तयार होणारे कंपोस्ट खत प्रतिष्ठान- मार्फत लागवड केलेल्या हजारो वृक्षांच्या संवर्धनासाठी वापरण्यात येणार आहे.तसेच सकाळी आठ वाजेपासून ते रात्री उशीरापर्यंत निर्मल्य संकलन चे काम सुरू होते.