shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने माजी गृहमंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच मातंग समाजाचा इंदापूर येथे होणार एल्गार सभा- शरद गायकवाड.




मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने माजी गृहमंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच मातंग समाजाचा इंदापूर येथे होणार एल्गार सभा- शरद गायकवाड. 
 बावडा येथे मातंग एकता आंदोलन संघटणेची आढावा बैठक संपन्न.                                              
इंदापूर : बावडा येथे मातंग एकता आंदोलन संघटणेची आढावा बैठक मातंग एकता अंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य माजी गृहमंत्री रमेशदादा बागवे , मातंग एकता अंदोलन संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष व पुणे म.न.पा नगरसेवक  अविनाश बागवे  यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा उपाध्यक्ष ललेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  मातंग एकता अंदोलन संघटनेचे इंदापुर तालुका अध्यक्ष शरद गायकवाड यांनी केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना तालुका अध्यक्ष शरद गायकवाड यांनी ५० शाखेच्या अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,कार्यकर्त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.  ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परीषद, पोलिस स्टेशन च्या ज्या काय अडी अडचनी असतील त्या मातंग एकता अंदोलन संघटनेच्या माध्यमातुन सोडवण्याच काम आपल्याला या ठीकाणी करायच आहे .लवकरच इंदापुर येथे मातंग एकता आंदोलन संघटणेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य माजी गृहराज्य मंत्री.रमेशदादा बागवे ,मातंग एकता अंदोलन संगटणेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष व पुणे म.न.पा नगर सेवक अविनाश बागवे यांच्या नेतृत्वाखाली इंदापुर तालुक्यातील मातंग समाजाची एल्गार सभा होणार आहे असे तालुका अध्यक्ष शरद गायकवाड यांनी सांगीतले  . 
यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष ललेंद्र  शिंदे ,महीला आघाडी महाराष्ट्र राज्य सचिव अनिताताई गायकवाड , शंकर रणदिवे, अक्षय गायकवाड,भोडणी उपसरपंच मल्हारी लोखंडे , राजु गाडे,दर्शन गायकवाड यांनी देखील मनोगत व्यक्त केल .तर आभार प्रदर्शन  चिंतामणी गायकवाड यांनी मानले. 
या आढावा बैठकीचे आयोजन मातंग एकता अंदोलन संघटणेचे इंदापुर तालुक अध्यक्ष शरद गायकवाड यांनी केले.
close