प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : ५ / म्युझिक लव्हर्स ग्रुपच्या वतीने आज गुरुवार दि . ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधुन कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्री . भाऊसाहेब बोठे यांचा शाल श्रीफळ व झाडाचे रोप देऊन श्री . पंढरीनाथ लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
सदर भेट म्हणून दिलेले युरेका पाम वृक्षाचे रोप साधारण १३० % ऑक्सिजन देते . हे रोप लावून त्याची जोपासना करणार असल्याचे बोठे साहेब यांनी आवर्जुन सांगितले . धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने सर्वांनी वृक्षारोपण करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले .
सभापती श्री .भाऊसाहेब बोठे यांचे नेहमीच संघटनेला सहकार्य लाभलेले आहे . या सत्कारा प्रसंगी भाजपा चे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग साहेब आणि इतर मान्यवर उपस्थित होते .