लोकप्रतिनिधींच्या शाश्वत विकास आणि
निधी आणल्याच्या फक्त वल्गना - ओगले
श्रीरामपूर प्रतिनिधी :
श्रीरामपूर मधील संगमनेर नेवासा रोड खड्डेमय झाला असून काही महिन्यातच या रोडचे तीन तेरा वाजल्याने त्वरित दुरुस्तीची मागणी जिल्हा बँकेचे संचालक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केली आहे. श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस,स्व. जयंतराव ससाणे मित्र मंडळाच्या वतीने, संगमनेर - नेवासा रोडची तातडीने दुरुस्ती व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आले, त्याप्रसंगी ससाणे बोलत होते. यानंतर मा.नगराध्यक्ष संजय फंड म्हणाले की, काही महिन्यापूर्वीच या रोडचे डांबरीकरण झाले होते. त्यावर एक ते दोन इंचाचा डांबराचा थर देऊन फक्त मलम पट्टी करण्यात आली. यानंतर मा नगराध्यक्ष अनिल कांबळे म्हणाले की, एकाच पावसात या रस्त्याची वाताहत झाल्याने कोट्यावधी रुपयांचा डांबरीकरण खर्च पाण्यात गेला.
यानंतर जी.प.चे माजी सभापती बाबासाहेब दिघे म्हणाले की, तात्पुरती डागडूजी करुन बनवलेल्या रस्त्यात मोठमोठे खड्डे झाले असून त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती सुधीर नवले म्हणाले की, संगमनेर नेवासा रोडवर झालेल्या खड्ड्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते आहेत अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे.
दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले म्हणाले की, लोकप्रतिनिधींनी श्रीरामपूरचा शाश्वत विकास आणि निधी आणल्याच्या फक्त वल्गनाच केल्या आहेत.
यानंतर माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहानी म्हणाले की लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे श्रीरामपूरचे वाटोळे झालं असून विकासाची घडी विसरली आहे. यानंतर बाजार समितीचे संचालक राजु चक्रनारायण, माजी नगरसेवक मुजफ्फर शेख, राजेंद्र सोनवणे, के.सी. शेळके, भारत भवार, अशोक जगधने यांनी आपल्या भाषणातून संगमनेर नेवासा रोडच्या दुर्दशेबाबत संताप व्यक्त केला. यावेळी श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना रस्त्याबाबत निवेदन दिले व लवकरात लवकर हा विषय मार्गी लावावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, बाजार समितीचे संचालक खंडेराव सदाफळ, राजेंद्र पाऊलबुद्धे, विलास दाभाडे, माजी नगरसेवक दिलीप नागरे, रितेश रोटे, दत्तात्रय सानप,आशिष धनवटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्ता कुऱ्हे, मर्चंट चे अनिल लुल्ला, दत्तात्रय धालपे, निलेश नागले, निलेश बोरावके,
कॉंग्रेस सेवा दल चे अहमदनगर जिल्हा मुख्य समन्वयक मास्टर सरवर अली सय्यद, मनसुख फरगडे, दत्तात्रय बिबवे, मिननाथ खडके, साईनाथ वेताळ, भागिनाथ शिरोळे, विलास लबडे, प्रवीण नवले, दगडू सोनवणे,मिथुन शेळके, दगडू डांगे, रियाजखान पठाण, अमोल नाईक, प्रशांत राऊत, अमोल शेटे, रितेश एडके, प्रकाश थोरात, बाळासाहेब थोरात, रावसाहेब आल्हाट, जावेद शेख, सुनील साबळे, रणजीत जामकर, नवाज जहागीरदार, शिवाजी वाबळे, संतोष परदेशी, बाबुभाई कुरेशी, सरबजीत सिंग चुग,मोहन रणवरे, जमील शहा, राजकुमार यादव, फैयाज कुरेशी, बबन आसने, अतिश देसर्डा, निसारभाई कुरेशी, तुकाराम बोडखे, भोला दुग्गल, युनूस पटेल, अंबादास निकाळजे, सुभाष पोटे,संतोष उगले, संदेश गोर्डे, वैभव कुऱ्हे, अनिल दुशिंग, सनी बाविस्कर,वैभव पंडित, प्रकाश वैष्णव, योगेश गायकवाड, अनिल लबडे, बाबा वायदंडे, विशाल साबळे,किरण लोखंडे, हर्षल दाभाडे, समीर पिंजारी, संजय गोसावी, अभिजीत चव्हाण, विशाल साळवे, राजेश जोंधळे, सागर दुपाटी, अमोल चिंतामणी, कल्पेश पाटणी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११