प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १४/ शेतकऱ्यांचा ऊसाला योग्य भाव देऊन त्यांना न्याय देण्याचे काम विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले असून, चालू वर्षी उच्चांकी दर, तर पुढील वर्षासाठी ३५००/- रुपये प्रति टन दर जाहीर करून ऊस दराची कोंडी फोडून बळीराजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिल्याबद्दल दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांच्या हस्ते चेअरमन अभिजीत पाटील यांचा प्रा. रामदास झोळ फाउंडेशन च्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना प्रा. रामदास झोळ सर म्हणाले की, सहकारी साखर कारखाना म्हणजे शेतकऱ्याचे मंदिर असून त्यांच्या कष्टाला योग्य दाम देऊन त्यांच्या संसाराला समृद्ध करण्यासाठी निरपेक्षपणे जाणकार नेता म्हणून अभिजीत पाटील यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात काम केलेले आहे. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव देऊन त्यांचा सन्मान केल्याबद्दल येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता त्यांच्या कामाची पोचपावती मत रुपी त्यांना देणारेच आहे. शेतकरी हिताचा विचार करणारा युवा नेता म्हणून आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो. अभिजीत पाटील यांचा आदर्श घेऊन सहकारी व खाजगी कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर दिल्यास खऱ्या अर्थाने त्यांचे जीवन समृद्ध होईल.
चेअरमन अभिजीत पाटील विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूर यांनी चालू वर्षी ऊसाला उच्चांकी दर दिल्याबद्दल आणि पुढच्या वर्षी ३५००/- रुपये प्रति टन दर जाहीर करून पुढच्या वर्षीची ऊस बिलाची कोंडी फोडल्याबद्दल त्यांचे आभार मानुन जाहीर सत्कार करण्यात आला.
सदर सत्कार समारंभास प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष रवी गोडगे, गणेश मंगवडे, सुदर्शन शेळके, प्रशांत नाईकनवरे, बापू फडतरे, भीमराव ननवरे व सत्यवान गायकवाड इत्यादी उपस्थित होते.