shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

प्रत्येक गावामध्ये एक अभ्यासिका सुरू झाली पाहिजे - आमदार दत्तात्रय भरणे.

प्रत्येक गावामध्ये एक अभ्यासिका सुरू झाली पाहिजे - आमदार दत्तात्रय भरणे.
इंदापूर:  आज प्रत्येक ग्रामपंचायतिने एकच मागणी केली पाहिजे की, प्रत्येक गावामध्ये एक अभ्यासिका सुरू झाली पाहिजे. त्या अभ्यासिका मध्ये सर्व सोयी झाल्या पाहिजेत. ग्रामीण भागामधील अनेक मुले ग्रामसेवक, तलाठी, अधिकारी झाले पाहिजेत. त्यांना खंबीर साथ देऊन त्यांच्या भविष्यामध्ये बदल घडवण्यासाठी गावात अभ्यासिका होणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवक यांनी मागणी केली पाहिजे असे प्रतिपादन 
इंदापूर पंचायत समिती येथे अल्पबचत सभागृहात जिल्हा परिषद पुणे समाज कल्याण विभाग पंचायत समिती इंदापूर यांच्यावतीने समाज मंदिराचे ग्रंथालय अभ्यासिकेत रूपांतर करण्यासाठी सोयी सुविधा पुरवणे साहित्य वाटप व कृषी विभागामार्फत थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कडबा कुटी खरेदी पूर्वसंमती पत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित (दि. 13 सप्टेंबर) करण्यात आले होते यावेळी बोलताना आमदार दत्तात्रय भरणे यांनी प्रतिपादन केले.

 यावेळी इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सचिन खुडे, पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश पांढरे, सरपंच प्रतिनिधी अतुल झगडे व इतर अन्य मान्यवर सरपंच ग्रामसेवक पंचायत समितीचे अधिकारी व लाभार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार कृषी विस्तार अधिकारी शेख यांनी केले. 
 
यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात काही ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांना अभ्यासिकेसाठी पुस्तके, टेबल, कपाट, ऑल इन वन कॉम्प्युटर असे साहित्य देण्यात आले व कृषी विभागामार्फत पूर्व सहमती पत्र देण्यात आले. 

 आ. भरणे म्हणाले की, महिला बचत गटांना स्वतंत्र कामकाजासाठी कार्यालय सर्व सोयीन युक्त झाले पाहिजेत. इंदापूर शहरात महिला बचत गट यांना स्वतंत्र १००० महिला बसतील असे भव्य अस्मिता भवन झाले पाहिजे. त्यामध्ये त्यांना रोजगाराच्या संदर्भातील प्रशिक्षण देता येतील. 

पुढे बोलताना आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील गोरगरीब मागासवर्गीयy अल्पसंख्यांक यांची मुलांना अभ्यासिकेमध्ये जाऊन अभ्यास करता येईल. पुढचे शिक्षण घेता येईल. त्यासाठी पुणे, मुंबई येथे जाण्याची गरज नाही म्हणून इंदापूर मध्ये बसून चांगल्या प्रकारचा अभ्यास करता येईल यासाठी येत्या आठ दिवसात अभ्यासिकेसाठी पाच कोटी रुपयाची इमारतीचे उद्घाटन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी भरणे यांनी दिली.
 तसेच कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या दारी जाऊन शेतकऱ्यांच्या फायदा होणाऱ्या योजना राबवाव्यात आणि गोरगरीब जनतेला घरकुल योजना कशा मिळतील यासाठी प्रयत्न केलाही पाहिजे.

घरकुला संदर्भात बोलताना भरणे म्हणाले की महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रामध्ये इंदापूर तालुक्यात धनगर आवास योजना द्वारे सर्वाधिक १२३६ घरकुले मंजूर झाले असून याचे श्रेय सरपंच ,ग्रामसेवक यांच्याबरोबर आमदार या नात्याने मलाही जाते अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले. 
...............

चौकट:
२०१२ ते २०१४ सालामध्ये मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष असताना कडबा कुटी, विद्युत मोटार, पाईप, पिठाची चक्की, कॉम्प्युटर इत्यादी साहित्य मिळवून दिले. त्यावेळी घेणाऱ्यांची संख्या कमी झाली होती. कुठलेही पद हे मिरवण्यासाठी नसते. त्यावेळी मी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हे पद न मिळवता त्याचा उपयोग केला. म्हणूनच मी आमदार झालो अशा प्रकारचे नोंद घेणारे काम केले तर आयुष्यात त्याची नोंद होती. उद्या आयुष्यात असाल या नसाल परंतु केलेल्या कामाची नोंद कायम लक्षात राहिली पाहिजे असे काम आपण केले पाहिजे. सर्वसामान्य ,गरीब माणसांना योजना माहीत नसतात त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवा, शेवटी आयुष्यात गरीब आयुष्यभर केलेल्या कामाची आठवण ठेवतो. सरळ कामे तर सर्वच करतात परंतु अवघड काम कायदेशीर मार्गाने करून दाखवतो त्याची नोंद होते. त्याची आठवण तो गरीब माणूस कधीच विसरणार नाही.
- आमदार दत्तात्रय भरणे
close