shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शिक्षक दिनानिमित्त शिक्षण संस्थेच्या वतीने पळसनाथ विद्यालयातील शिक्षकांचा सन्मान सोहळा पळसदेव येथे संपन्न- भूषण काळे*

*शिक्षक दिनानिमित्त शिक्षण संस्थेच्या वतीने पळसनाथ विद्यालयातील शिक्षकांचा सन्मान सोहळा पळसदेव येथे संपन्न- भूषण काळे*
आप्पासाहेब यमपुरे
इंदापूर (पळसदेव )दि:5 सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस एक शिक्षक ते राष्ट्रपती पदापर्यंत त्यांनी खूप मोठे कार्य केले.विद्यार्थी त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास कार्यक्रमासाठी त्यांच्याकडे यायचे.राधाकृष्णन यांनी मात्र शिक्षकांच्या समाजातील महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव करण्या: : साठी 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून घोषित करण्यात यावा अशी विनंती केली.आणि तेव्हापासून पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.
          शिक्षक दिनाचे औचित्य साधून पळसनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे यांच्या कल्पनेतून शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी पळसनाथ विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि विविध शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान ओळखण्यासाठी पळसनाथ शिक्षण संस्था नेहमीच शिक्षकांना प्रोत्साहन देत असते.अशा प्रकारचे शाळेमध्ये विविध उपक्रम साजरे केले जातात.
        याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. नुकताच जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झालेले विद्यालयातील जूनियर विभागाचे मराठी विषयाचे प्रभावी अध्यापन करणारे प्रा.अशोक जाधव यांचा विशेष सन्मान संस्थेच्या व पळसनाथ विद्यालयाच्या वतीने करण्यात आला.
        आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांकडून नेहमीच मार्गदर्शन मिळत असते.चांगले अध्यापनाचे कार्य त्यांच्याकडून होते.विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून उच्च शिक्षणासाठी ज्यावेळेस आपण बाहेर जातो त्यावेळेस त्यांचा हा अमूल्य ठेवा आपल्या जीवनामध्ये आणावा व आपले करिअर घडवावे आई-वडील हे आपले पहिले गुरु असले तरी शिक्षक हे आपल्या जीवनाचा खरा मार्ग दाखवणारे गुरु आहेत.असे संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे म्हणाले
        याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे सचिव योगीराज काळे खजिनदार बबन आबा काळे, संस्थेचे सर्व विश्वस्त मुख्याध्यापक विकास पाठक पर्यवेक्षक संजय जाधव शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
close