एरंडोल प्रतिनिधी :- येथे गणेश विसर्जन व ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार कोठेही घडू नये यासाठी शहरातील प्रमुख भागांत एरंडोल पोलीसांकडून रूट मार्च काढण्यात आला.
या पथसंचलनात उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल नंदवाळकर,पोलिस निरिक्षक सतीश गोराडे,सहायक पोलिस निरीक्षक शंकर पवार,पोलिस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या सह पोलिस स्टेशन चे सर्व कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाच्या जवानांचा समावेश होता.