नारायण पाटील गटाला पश्चिम भागात खिंडार
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २६ / करमाळा तालुक्यातील टाकळी येथील मा. सरपंच विलास करचे यांचा भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल यांच्या नेतृत्वाखाली व युवा नेते दिग्विजय भैय्या बागल यांच्या प्रमुख उपस्थितीत उमरड येथील कार्यकर्ता मेळाव्यात सरपंच विलास मामा करचे व यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी रश्मी दिदी बागल यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा युवा नेते दिग्विजय भैय्या बागल यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी करचे यांनी बोलताना सांगितले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम भागात रश्मी दिदी बागल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व ताकतीने खंबीर पणे उभे राहून जास्तीत जास्त प्रमाणात मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.
यावेळी ज्येष्ठ नेते मकाई सह साखर कारखाना संचालक बाळासाहेब पांढरे, विद्यमान चेअरमन दिनेश भांडवलकर, सतीश नीळ, गणेश झोळ, सचिन पिसाळ, नवनाथ बागल, रेवणाथ निकत, दिनकर सरडे, राजेंद्र मोहोळकर, संतोष वारगड, महिला नेत्या साधना खरात, बापूराव चोरमले, विविध गावांतील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.