अहमदनगर / प्रतिनिधी:
अहमदनगर येथील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय अर्थिक अश्या अनेक क्षेत्रात राज्यभर सक्रिय असणारे तंबोली हज टूर्स चे संचालक हाजी शौकत तांबोली यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाकडे अहमदनगर शहरातून उमेदवारी मागितली आहे.
राष्ट्रवादी भवन येथे अल्पसंख्यांक प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष हाजी शौकत तांबोळी यांनी अहमदनगर शहर २२५ विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव लोटके सर व कार्यालयीन प्रमुख अमोल जाधव यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी नगर तालुका अध्यक्ष रोहिदास कर्डिले, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष अथर खान, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सय्यद खलील, अल्पसंख्यांक उपाध्यक्ष समीर पठाण, व्यापारी व उद्योग सेलचे अध्यक्ष अनंतराव गारदे, प्रदेश सचिव फारूक रंगरेज,फयाज तांबोळी, जीशान खान,निसार बागवान, फरान रंगरेज आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी हाजी शौकत तांबोळी म्हणाले की, २२५ अहमदनगर शहर विधानसभेच्या जागेसाठी उमेदवारी मागितली असून अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्तील हिंदू, मुस्लिम,ओबीसी समाजाचे तसेच बहुजन समाजाचे अनेक प्रश्न सोडवलेले आहेत व पक्षाच्या स्थापनेपासून काम करत असून सामाजिक,धार्मिक, राजकीय, शैक्षणिक कार्यात अग्रस्थानी असतात तसेच संपूर्ण जिल्हाभर व जिल्ह्याच्या बाहेर देखील जनसंपर्क दांडगा असुन अनेक संघटनांनी व समाजाने अहमदनगर शहर विधानसभा लढवण्यासाठी विनंती केल्याने हा उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची भावना हाजी शौकत तांबोली यांनी व्यक्त केली.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११