सांगली, दि. 11- स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ व महाराष्ट्र राज्य मंत्रालय समन्वय समिती, मुंबई यांच्यावतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्याचे राज्य कोषाध्यक्ष प्रा. दिलीप आनंदराव जाधव यांना सोलापूर जिल्हा जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या हस्ते हा पुरस्कार सोलापुरातील केगाव येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख, महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब आडसूळ ,सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनिष काळे, सहाय्यक पोलिस उपायुक्त राजन माने, आदी उपस्थित होते. प्रा जाधव हे सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सचिव, महाराष्ट्र राज्य निसर्ग आणि पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ राज्य कार्यकारिणी सदस्य पदी कार्यरत आहेत ते रयत शिक्षण संस्थेच्या ग रा वारंगे ज्युनिअर कॉलेज मलकापूर येथे मराठी विषयाचे अध्यापन करतात.