shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

सामाजिक सलोखा आणि सेवाभाव जपणे हीच श्रीरामपूरची खरी ओळख- प्राचार्य शंकरराव अनारसे


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
 श्रीरामपूर हेआधुनिक शहर आहे. रेल्वे स्टेशन, उद्योगधंदे, व्यापार,शिक्षण, विविध व्यवसाय आणि निवांत वसतिस्थान असल्यामुळे अनेक भागातून विविध लोक येथे आले, त्यांनी श्रीरामपूरला प्रतिष्ठा दिली. त्यामुळेच सामाजिक सलोखा आणि सेवाभाव हीच श्रीरामपूरची खरी ओळख आहे, हे लक्षात घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन साहित्यिक,माजी प्राचार्य शंकरराव अनारसे यांनी केले.

    श्रीरामपूर येथील थत्ते ग्राऊंड परिसरात असलेल्या अनारसे हॉलमध्ये वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे  श्रीगणेशमूर्ती पूजन, साहित्यसंवाद, सन्मान आणि सामाजिक सलोखा विषयावर प्राचार्य अनारसे सत्काराला उत्तर देताना बोलत होते. 
याप्रसंगी वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सांगितले की,प्राचार्य शंकरराव अनारसे हे ८७ वर्षाच्या जीवन वाटचालीत साहित्यिक योगदान देत आहेत. त्यांनी विविध पुस्तके लिहून समाज प्रबोधन केले. आजही त्यांचे सामाजिक लेखन सुरु आहे. त्यांचा सन्मान म्हणजे गुरुकुलाचा सन्मान असल्याचे सांगून परिचय करून दिला. प्राचार्य टी.ई. शेळके यांच्या हस्ते शाल, पुस्तके व भेटवस्तू देऊन प्राचार्य अनारसे आणि सौ. कमलताई अनारसे यांचा सत्कार करण्यात आला. विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे सुखदेव सुकळे आणि प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी मित्रमंडळातर्फे सत्कार केला. प्राचार्य अनारसे यांच्या शैक्षणिक कार्याचे मोठेपण सर्वांनी सांगितले.
         प्राचार्य अनारसे म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर दादा पाटील यांच्यामुळे माझे शिक्षण झाले. १९६२ पासून शिक्षण क्षेत्रात मी कार्यरत            झालो. १९७० ते १९९८ या काळात श्रीरामपूरच्या स्वामी सहजानंद भारती शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्राध्यापक, प्राचार्य म्हणून काम केल्याने खूप चांगला अनुभव आला. अनेक चांगली इमारती व शैक्षणिक उपक्रम अशी कामे करता आली आहेत, कारण श्रीरामपूरची माणसे खूप समजुतदार आहेत.आपण सर्वजण येथे एकमेकांच्या हितासाठी आणि गरजेपोटी आलो आहोत. येथे सर्व धर्म, जाती,पंथ, व्यवसायिक गुण्यागोविंदाने नांदतात, हिच एकरूपता आणि सामाजिक सलोखा जाणीव टिकविणे  श्रीरामपूरकरांची उत्कट सदिच्छा आहे असे सांगून प्राचार्य अनारसे पुढे म्हणाले,.डॉ. बाबुराव उपाध्ये व डॉ. शिवाजी काळे हे' वैभवशाली श्रीरामपूर' पुस्तक संपादित करीत आहेत. त्यातून श्रीरामपूर आणि येथील कर्तबगार व्यक्तिमत्त्वे यांचा परिचय होणार आहे. या पुस्तकात माझाही लेख आहे, त्यातून शैक्षणिक अनुभव सांगितले आहेत, ही माहिती देऊन प्राचार्य अनारसे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.प्रा. शिवाजीराव बारगळ यांचा कर्मवीर जयंतीला पुरस्काराने सन्मान होणार असल्याने त्यांनाही अनेकांनी शुभेच्छा दिल्या. 
         प्राचार्य अनारसे लिखित' शब्दवैभव',' माळावरची माती',' फळे रसाळ गोमटी' आदी पुस्तकावर चर्चा करण्यात आली. सो. कमलताई अनारसे यांनी नियोजन करून आभार मानले.

वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
close