अकोले :-तालुक्यातील कळस येथील विक्रांत प्रकाश आल्हाट यांची पोलीस उपनिरीक्षक ( पी.एस.आय.) पदी निवड झाली.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने 2022 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये विक्रांत आल्हाट यांना एससी प्रवर्गातून पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 325 रँक मिळाली आहे.
कळस सोसायटी चे संचालक व आदर्श इंग्लीस स्कुल वडगाव लांडगा येथील प्रयोगशाळा परिचर प्रकाश आल्हाट व अकोले एस टी आगरा च्या बस वाहक सौ. मंदा आल्हाट यांचे चिरंजीव विक्रांत आहे. गरिबीच्या परिस्थितीतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून एम.पी.एस.सी. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. यासाठी श्रीमती पुष्पा ढगे, कैलासराव वाकचौरे यांनी मोठी मदत केली.
विक्रांत आल्हाट याचे निवडी बद्दल गावात ढोल ताशा च्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थ व सत्कार सोहळा समिती च्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी मंत्री मधुकराव पिचड व आमदार डॉ. किरण लहामटे, संगमनेर च्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सेवा निवृत्त प्रशासकीय अधिकारी निर्मलकुमार देशमुख, जिल्हा बँकेचे व्हा. चेअरमन माधवराव कानवडे, जिल्हा परिषद चे माजी अर्थ बांधकाम समिती चे सभापती कैलासराव वाकचौरे, गटनेते जालिंदर वाकचौरे आदी उपस्थित होते.