शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
शैक्षणिक बातमी
उत्कृष्ट उपक्रमशील व आदर्श शिक्षक म्हणून विद्यालय कडेठाण येथील शिक्षक विशाल देशमुख यांना जिल्हा शिक्षण आघाडी संस्थेच्यावतीने पैठण येथे गौरविण्यात आले. ८ सप्टेंबर रोजी हा सोहळा पार पडला. संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रथम कोल्हे, उपाध्यक्ष संजय भातलवांडे, ज्योती तुपे, रंगनाथ लघाणे, राजेंद्र कदम, नगराध्यक्ष लोळगे आदी उपस्थित होते .यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की, ग्रामीण भागातील या शाळेत ५ वी ते १० वी पर्यंत वर्ग आहेत.
ग्रामीण भागातील, विद्यार्थ्यांमध्ये खूपकाही कौशल्य दडलेले असते. फक्त ते अलगद उकलावे लागते. आणि ते काम शिक्षकाचे असायला हवे. शिकत असताना मुलांना आनंद मिळायला हवा, त्यांना त्याचं दडपण यायला नको. या यशामध्ये माझे सहकारी आणि विद्यार्थ्यांचे मोठे योगदान असल्याचे देशमुख म्हणाले.