लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी मध्ये शिक्षक दिन उत्साहात संपन्न.
इंदापूर: *दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांना अभिरुप शिक्षक म्हणून अध्ययन- अध्यापनाचा अनुभव यावा,अध्यापन करताना विद्यार्थी प्रतिक्रियेचे महत्व समजावे यासाठी इ.१० मधील विद्यार्थ्यांनी आज अभिरूप शिक्षकांची भुमिका बजावली.*
*इ.५ वी ते १० वी पर्यंत सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचे काम अभिरूप शिक्षकांनी केले.*
*विद्यालयातील जेष्ठ शिक्षक व कार्यक्रमाचे श्री.शशिकांत गायकवाड सर ,सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.*
*अभिरूप शिक्षकांच्या हस्ते विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद यांचा सन्मान करण्यात आला.*
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. राजेंद्र रणमोडे सर यांनी केले. कु.संस्कृती बोराडे हिने आकर्षक पुस्तकाच्या डिझाईनचा केक आणला. अभिरूप मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या हस्ते कापून शिक्षक दिन साजरा करण्यात आला.*
*विद्यार्थी मनोगतात कु.श्वेता निंबाळकर, कु.स्वरांजली देवकर, कु.रूपाली हेगडकर , चि.मयूर सवासे, कु.हर्षदा निंबाळकर,कु.विद्या निकम, अभिरूप शिक्षक चि.रोहित भोसले, कु.स्नेहल बरकडे, कु.ऐश्वर्या जाधव, चि. पृथ्वीराज तरंगे, अभिरूप उपमुख्याध्यापिका कु. साक्षी मारकड,अभिरुप मुख्याध्यापक चि. गुरुदेव कुंभार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.*
*शिक्षक मनोगतात श्री. अमर निलाखे सर यांनी आवडत्या क्षेत्राबद्दल विद्यार्थ्यांनी आपले करिअर करावे तसेच बदलत चाललेल्या परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांनी कष्ट, जिद्द चिकाटी यांच्या जोरावर यशस्वी व्हावे असे सांगितले तर श्री.वैभव सोलनकर सर यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात गुरू चे महत्व केले. अध्यक्षीय भाषणात श्री.शशिकांत गायकवाड सर सर यांनी समता,बंधुता जोपासत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करावे. आपल्या अध्ययनातील शंकांचे वेळोवेळी विद्यार्थ्यांनी निरसन करून घ्यावे असा संदेश दिला*
*कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. राजेंद्र रणमोडे सर ,श्री.भिमराव खाडे सर व इ.१० वी मधील विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.*
*कार्यक्रमाचे आभार अभिरूप शिक्षक चि.तुषार खाडे याने केले तर सूत्रसंचालन कु.तेजश्री मोरे व कु. स्नेहा निंबाळकर यांनी केले.*