shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

खा.स्मिता वाघ यांच्याकडून महामार्गाची पाहणी.

 

जळगांव :- गेल्या काही दिवसापासून जळगांव शहरातील महामार्ग हा मृत्यचा मार्ग झाला असून ठेकेदार व शासकीय यंत्रणा महामार्गावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित करण्यात अपयशी ठरल्याने खा.स्मिता वाघ यांनी  शहरातील महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करत शासकीय यंत्रणेला लवकरच ह्या समस्येवर तोडगा  काढण्याचे आदेश दिले.यावेळी आ.सुरेश भोळे उपस्थित होते.

खा.स्मिता वाघ यांच्याकडून महामार्गाची पाहणी.

जळगांव शहरातील महामार्गावरील खड्डे तातडीने आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे बुजविने तसेच ब्लाइंड स्पॉट निश्चित करून त्यावर उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना खा.स्मिता वाघ यांनी शासकीय यंत्रणा व कंत्राटदार यांना दिल्या.शहरातील महामार्गावरील वाहतुकीचा बोजा कमी करण्यासाठी बाह्य वळण मार्गाच्या कामाला गती देण्याची गरज असून बाह्य वळण मार्गाचे तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे खा.स्मिता वाघ यांनी सूचित केले.


यावेळी भाजपा महनगरध्यक्षा उज्वला बेंडाळे,सीमा भोळे,दीपक सूर्यवंशी,राहुल पाटील यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व कंत्राटदार यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

close