श्रीरामपूर / प्रतिनिधी:
सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ आमदार लहू कानडे तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर चार तास आत्मक्लेष आंदोलन केले.
सकाळी दहा वाजता महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी आ. कानडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी तोंडाला व दंडाला काळ्या फीत बांधून राज्य सरकारच्या बेजबाबदारपणाचा निषेध केला. यावेळी घोषणाही देण्यात आल्या. दुपारी दोन वाजता आंदोलनाची सांगता झाली. श्रीरामपूर मर्चंट असोसिएशन, श्रीरामपूर वकील संघ, संभाजी ब्रिगेड, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच मुस्लिम व आदिवासी बांधवांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आत्मक्लेषा आंदोलनास पाठिंबा दिला.
यावेळी माध्यमांशी बोलताना आ. कानडे म्हणाले की, आठ - नऊ महिन्यापूर्वी उभारलेल्या तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा काही दिवसांपूर्वी कोसळला. केंद्र व राज्य सरकारच्या बेजबाबदारपणामुळेच सदरची दुर्घटना घडली आहे. त्यामुळे कोट्यावधी शिवप्रेमींच्या भावनांना ठेच पोचली. महाराष्ट्रामध्ये आक्रोश निर्माण झाला. जनभावना दुखावल्याने काँग्रेस पक्षाच्यावतीने आज आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले.
यानिमित्ताने अशा घटना पुन्हा घडू नयेत तसेच श्रीरामपूरच्या जनतेची खूप वर्षापासून शहरातील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याची मागणी आहे त्यासाठी श्रीरामपूर नगरपरिषदेने छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे देखील तयार करून घेतले आहेत. केवळ जागेअभावी सदरचे प्रकल्प रखडले आहेत.
आता जिल्हा नियोजन मंडळानेच प्रत्येक तालुक्यात शिवस्मारक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावेळी आपण मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून फक्त जागेचा प्रश्न शासनाने सोडवावा व श्रीरामपूर नगरपरिषदेने बनवलेला शिवरायांचा पुतळ्याचे यथायोग्य ऑडिट करून बसवावा, अशी मागणी केली आहे. तथापि एक कोटी रुपये खर्चून नवीन पुतळ्याचा घाट घातला जात आहे. आम्हाला भीती वाटते की केवळ पैसे खर्च करण्यासाठी व कोणालातरी कंत्राट देण्यासाठी घाईघाईने पुतळा बनविला गेल्यास राजकोटसारखी दुर्घटना घडू शकते. तेव्हा श्रीरामपूर येथील शिवाजी चौकामध्येच नगरपरिषदेने बनविलेलाच छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवावा म्हणजे वेळकाढूपणा होणार नाही. तसेच डॉ आंबेडकर पुतळ्याच्या जागेचा प्रश्नही तातडीने सोडविण्यात यावा, अशी मागणी आ. कानडे यांनी यावेळी केली.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, उद्योजक अंकुश कानडे, माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे, प्रा. कार्लस साठे, माजी नगरसेवक अंजुम शेख, सतीश बोर्डे, सचिन जगताप, नानासाहेब रेवाळे, विष्णुपंत खंडागळे, सरपंच अशोक भोसले, सुरेश पवार, हरिभाऊ बनसोडे, अमोल आदिक, आबा पवार, ऍड. समीन बागवान, राजेंद्र औताडे, एनएसयुआयचे प्रदेश सरचिटणीस अक्षय नाईक, माजी नगरसेवक कलीम कुरेशी, प्रकाश ढोकणे, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील गुप्ता, पुरुषोत्तम झंवर, प्रवीण गुलाटी, गौतम उपाध्ये, संजय कासलीवाल, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ऍड. राजेश बोर्डे, बाळासाहेब उंडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, युनुस पटेल, रा. ना. राशिनकर, अजिंक्य उंडे, दीपक निंबाळकर, भैय्या शहा, माजी सभापती वेणुनाथ कोतकर, रज्जाक पठाण, ज्ञानदेव आदिक, सरपंच भारत तुपे, सुदाम पटारे, प्रताप पटारे, मदन हाडके, दीपक पवार, रमेश उंडे, दिलीप अभंग, मच्छिंद्र मासाळ, सुभेदार सय्यद, रोहित खाडे, बाबासाहेब कोळसे, दादासाहेब कांबळे, रवींद्र मुरकुटे, विजय दवंगे, बाबासाहेब ढोकचौळे, ऍड. अण्णासाहेब मोहन, राजेंद्र गवारे, सामाजिक कार्यकर्ते अहमद जहागीरदार, आदिवासी संघटनेचे शिवाजी गांगुर्डे, मुदस्सर शेख, विठ्ठल ठोकळ, सचिन पोखरकर, यशवंत तनपुरे, संदीप दांगट, अमोल कवडे, प्रकाश थोरात, बापूसाहेब लबडे, साईनाथ गवारे, रामचंद्र पाटील, मधुकर ठोबरे, संजय भनगडे, रवी राजुळे, दत्तू भांड, जे. बी. काळे, रघुनाथ भांड, सुखदेव काळे, विजय खाजेकर, महिला काँग्रेसच्या तालुका समन्वयक रुबीना पठाण यांच्यासह श्रीरामपूर तालुका तसेच राहुरी तालुक्यातील ३२ गावातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११