shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

आ.पंकजाताईंची केवळ केजच्या उमेदवारीसाठी शिफारस आ.नमिताताई मुंदडा यांचीच महायुतीकडून उमेदवारी जिल्ह्यातून पहिल्याच यादीत येणार आ. मुंदडाचे नाव!!

प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी !!

विधान परिषद सदस्य तथा भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस आ.पंकजाताई मुंडे यांच्यावर पक्षाने पुणे जिल्ह्यातील तीन मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे पंकजाताईंनी आपले पूर्ण लक्ष त्या मतदारसंघावर केंद्रित केले असून बीड जिल्ह्यातील किती मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला येणार आहेत? किंवा उमेदवार कोण असतील? हे आज स्पष्ट झालेले नाही.पण ज्यांच्यावर जास्त विश्वास होता त्यांच्याकडूनच लोकसभेला दगाफटका झाला मग त्यांच्यासाठी पक्ष समोर पदर का पसरावा? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून आ. पंकजाताई यांनी केवळ केज विधानसभेसाठीच  शिफारस केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यावरून आता केज विधानसभा मतदारसंघातून भाजप- महायुतीच्या उमेदवार विद्यमान आ. नमिताताई मुंदडा याच असणार आहेत आणि त्यांचीच उमेदवारी अंतिम मानली जात आहे. गणेशोत्सवानंतर जाहीर होणाऱ्या पहिल्या यादीत आ. नमिताताई मुंदडा यांचे नाव असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.




           बीड लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील बीड, गेवराई,केज मतदार संघातून पंकजाताईंना मोठा फटका बसला तर परळी,आष्टी, माजलगाव मतदार संघाने आघाडी दिली.परंतु ६५८५ मतांनी पंकजाताईंचा पराभव झाला. हा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला.त्यातून काही तरुणांनी जीवन संपवले. तसेच जिल्ह्यातील राजकारण सुद्धा आता बदलले आहे. महायुतीमुळे कोणाच्या वाट्याला किती? व कोणत्या? जागा हा प्रश्न अनुतरीत आहे.त्या संदर्भातील बोलणी सुरू आहे.महायुतीच्या सूत्राप्रमाणे ज्याचा विद्यमान आमदार त्याच पक्षाला ती जागा सोडली जाणार आहे? का किंवा जागा आदलाबदलीची ही चर्चा सुरू आहे. अशा क्लिष्ट वातावरणात रमण्यापेक्षा पंकजाताईंनी मुक्त व स्वच्छ वातावरणात राहणं पसंत केले आहे. ज्यांच्यामुळे दगा फटका झाला त्यांची वकिली आपण कशी करावी? असा प्रश्न  पंकजाताईंच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.गढूळ वातावरणापेक्षा सुसंस्कृत पुण्यातील तीन मतदार संघाची जबाबदारी पंकजाताईंना देण्यात आली आहे.जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन जागा वाटपाचा प्रश्न मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री ना. धनंजय मुंडे व आ. पंकजाताई मुंडे मार्गी लावणार आहेत. पण सूत्राच्या माहितीनुसार आ. पंकजाताईंनी केवळ केजची जागा भाजपाला व विशेषतः त्यांच्या गटाला मिळावी अशी मागणी केली आहे.इतर जागांवर त्यांनी फारशी रुची दाखवली नाही.

 केज विधानसभा मतदार संघासाठी मात्र पंकजाताईंनी आग्रह धरला आहे. कारण आ. नमिताताई मुंदडा,

 ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुदडा व युवा नेते अक्षय मुंदडा यांनी लोकसभा निवडणुकीत पंकजाताईंच्या विजयासाठी जिवाचे रान केले पण त्यांना यश आले नाही. मेहनत करणाऱ्यांचे परिश्रम वाया जाऊ द्यायचे नाहीत या भूमिकेतून पंकजाताईंनी आ.नमिताताई मुंदडा यांचा आग्रह धरला आहे. त्यामुळे आ. नमिताताई मुंदडा यांचीच उमेदवारी सेफ झोनमध्ये मानली जात आहे.शिवाय त्यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला असून गणेशोत्सवानंतर भाजपाची पहिली 25 उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे या पहिल्या यादीत नमिताताईंचा समावेश असणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. केज विधानसभा मतदारसंघात आ.नमिताताई मुंदडा यांनी गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात भरीव अशी विकास कामे केले आहेत. शहरातील सर्व रस्ते हे महामार्गाशी जोडून चार पदरी व सहा पदरी केले आहेत. प्रत्येक गल्लीतील रस्ता हा सिमेंट काँक्रेटचा केलेला आहे  गावोगावी रस्ते, वीज आणि भूमिगत गटारे उभी केले आहेत. मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली असून केज येथे औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मार्गी लावला आहे. मतदार  संघातील प्रत्येक गावात आ. नमिताताई मुंदडा यांचे काम कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात दिसते आहे. त्यामुळे आ. नमिताताई मुंदडा यांचे केज विधानसभा मतदारसंघातील भाजपा व महायुतीच्या उमेदवार असतील हे आता अधोरेखित झाले आहे

close