कोल्हार खुर्द, चिंचोली व पिंपळगाव फुणगी येथील तलाठी कार्यालय इमारतीचे उद्घाटन
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
राज्यातील सरकारला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न माहीत नाहीत. व्यापारी, दुकानदारांचे दुःख माहीत नाहीत. हे सरकार पूर्णपणे शेतकरीविरोधी सरकार असल्याचे टीका करून या गोष्टी जनतेला समजायला हव्यात, यासाठी हा संवाद दौरा असल्याचे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केली.
काँग्रेस बळकटीकरण व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. कानडे यांनी सुरू केलेल्या जनसंवाद दौऱ्यात राहुरी तालुक्यातील रामपूर, कोल्हार खुर्द, चिंचोली, पिंपळगाव फुणगी व गंगापूर या गावात झालेल्या जनसंवाद बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. कानडे यांच्या हस्ते कोल्हार खुर्द, चिंचोली व पिंपळगाव फुणगी येथील नवीन तलाठी कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. श्रीरामपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक, उद्योजक अंकुश कानडे, अमृतकाका धुमाळ, नानासाहेब रेवाळे, दीपक पवार या दौऱ्यात त्यांच्यासोबत होते.
यावेळी बोलताना आ. कानडे म्हणाले की, निवडणुका दोन महिन्यावर आल्या आहेत. सध्याचे राजकारण कोणत्या दिशेने चालू आहे हे जनतेला समजले पाहिजे, या दृष्टीने संवाद यात्रा आहे. सन १४ साली राज्यात फडणवीस यांचे तर केंद्रात मोदी यांचे सरकार आले. तेव्हापासून अत्यंत क्रूरपणे निर्णय घेतले. या सरकारने पूर्वी कधीकाळी ब्रिटिशांनी मिठावर कर लावला होता. त्यावेळी देश पेटून उठला होता. यांनी मात्र मिठावरच नाही तर पिठावरही कर लावला. सर्व वस्तूंना जीएसटी लावून महागाईचा आगडोंब भडकवला. नोटबंदीचा निर्णय केला. त्याचा सर्वात जास्त त्रास गरीब माणसांना झाला. शेतकरी, कष्टकरी, मजूर यांच्यासाठी हा निर्णय सैतानी प्रकारचा असल्याचे ते म्हणाले.
महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विशेष सहकार्याने श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात ३१ तलाठी कार्यालय मंजूर करण्यात आली. प्रत्येक तलाठी कार्यालयासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. कोल्हार खुर्द, चिंचोली व पिंपळगाव फुणगी या तलाठी कार्यालयांचा त्यात समावेश आहे. यातील बहुतेक तलाठी कार्यालयाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामेही लवकरच होतील. ग्रामीण भागात सुसज्ज अशी तलाठी कार्यालय झाल्याने कष्टकरी शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे.
श्रीरामपूर तालुक्याप्रमाणे राहुरी तालुक्यातील ३२ गावांसाठी आपण भरीव निधी दिला असून या निधीतून रस्ते वीज पाणी या महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक केली आहे. राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी वांजुळपोई येथे सबस्टेशन मंजूर केले. याशिवाय जिल्हा परिषद शाळांना एलएफडी, तरुणांसाठी ओपन जीन्स साहित्य, तलाठी कार्यालय, शाळा खोल्यांचे बांधकाम अशी कामे केली आहेत, अजूनही काही कामे शिल्लक आहेत, ती पुढील काळात निश्चितच पूर्ण करू, असे आ. कानडे म्हणाले.
यावेळी सरपंच गणेश हारदे, बाळासाहेब काळे, बाळासाहेब पारखे, राजेंद्र लाटे, सुनील काळे, सुधाकर पठारे, सुनील लाटे, बन्सी भोसले, नितीन खळदकर, तुषार तनपुरे, केशवराव लोखंडे, रावसाहेब पठारे, शिवाजी नाळकर, मनोज सरोदे, प्रवीण कानडे, एकनाथ कानडे,सतीश शिरसाठ,निकेतन पानसरे, भास्कर घोगरे, प्रभाकर जाधव, चंद शेख, सुनील भोसले, सुरेश भोसले, अविनाश लोंढे, रखमाजी क्षीरसागर, अनिल शिरसाठ, सतीश खांडके, गोरक्षनाथ नान्नोर, बाबासाहेब साळुंखे, विवेकानंद देवकाते, प्रभाकर कातोरे, नकुल आहेर, सुखदेव खटके, गेनू शेरमाळे, बबन माळी, शाहरुख शेख, पांडुरंग तोरे, दत्तात्रय जाधव, संजय वडीतके, मदिना शेख, रुकसाना शेख, बाळासाहेब बर्डे, प्रकाश रोकडे, अण्णासाहेब फुनगे आदींसह बूथ कमिटी सदस्य ग्राम काँग्रेस कमिटी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११