कोपरगांव / प्रतिनिधी: तालुक्यातील धामोरी येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात विद्यालयाच्या अंतर्गत सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आली.या समितीचे उदिष्टे असे की,मुलींच्या विकासासाठी काम करणे- शैक्षणिक आणि सामाजिक संधी उपलब्ध करून देणे त्यांना सशक्त बनविणे असे होय.
या सखी सावित्री समितीची स्थापना प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून धामोरी येथील पोलीस पाटील सौ. संगिताताई ताजणे,धामोरी येथील आशा स्वयंसेविका मिरा शिरसाठ,कविता हराळे,निर्मला जगझाप, मनिषा गायकवाड विद्यालयातील मुख्याध्यापक एस.टी.बागल, बी.एम. गायकवाड आदि शिक्षक व शिक्षकेतर उपस्थित होते.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दत्तात्रय घुले - धामोरी
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर -९५६११७४१११