साने गुरुजींच्या संवेदनशीलतेचा प्रभाव आजच्या शिक्षणात हवा - मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
शिक्षण हे विद्यार्थ्यांची मानसिक, बौध्दिक, शारीरिक, सामाजिक संवेदनशीलतेची जडणघडण करते, साने गुरुजींनी या मूल्यांची सदैव जोपासना केली, अशी संवेदनशीलता आजच्या शिक्षणात दिसायला हवी अशी अपेक्षा अकोले येथील मॉडर्न हायस्कूलचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
येथील आंतरभारती शाखेतर्फे मुख्यध्यापक हेरंब कुलकर्णी यांचे शिक्षकांसाठी साने गुरुजी विषयावर आगाशे सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्याप्रसंगो ते बोलत होते.अध्यक्षस्थानी अड, रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान कार्यकारिणी चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. प्रारंभी गवळी, गाडेकर मॅडम, अवधूत कुलकर्णी व विद्यार्थिनी यांनी साने गुरुजींची गीते सादर केली. आंतरभारती शाखेचे उपाध्यक्ष प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. शाखा संस्थापक,अध्यक्ष सुभाष लिंगायत यांनी नियोजन करून उपस्थित मान्यवरांचे सत्कार केले. प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी उपस्थित होत्या. प्रा. आदिनाथ जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम , डॉ. दिलीप पडघन, डॉ.सौ. सिंधुताई पडघन, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, प्राचार्या डॉ. सुनीता गायकवाड, मुख्याध्यापिका विद्या कुलकर्णी, सोनाली पुंड, मुख्याध्यापिका पैठणे, प्रा. दिलीप सोनवणे,अरविंद वाणी, दत्तात्रय रायपल्ली, श्रीराम बोबडे, कवयित्री संगीता फासाटे, लेविन भोसले, पत्रकार अशोक गाडेकर, मिलिंदकुमार साळवे, चंद्रकांत कोकाटे, सौ. कोकाटे, जेजुरकर, जपेसर, आनंद वाघ, विनायक कुलकर्णी, दामोदर जानराव, प्रदीप धुमाळ आदीसह शिक्षक, रसिक उपस्थित होते. यावेळी संगमनेरचे प्रा. दिलीप सोनवणे यांनी हेरंब कुलकर्णी यांना' देवमाणूस' पुस्तक, शाल देऊन सत्कार केला. डॉ. उपाध्ये यांनी आपली पुस्तके सर्वांना भेट दिली. कोकाटे परिवार, प्राचार्या डॉ. गायकवाड, मिलिंदकुमार साळवे, संगीता फासाटे, गाडेकर परिवार आदिंनी हेरंब कुलकर्णी यांच्या शिक्षकांसाठी साने गुरुजी विषयावरील श्रीरामपूरातील २५ व्या व्याख्यान उपक्रमांबद्दल सत्कार केले. मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांनी साने गुरजी यांच्या चरित्राचा सविस्तर परिचय देत त्यातील मूल्यनिष्ठ विचार व्यक्त केले.
साने गुरुजींनी केवळ रडके म्हणून संवेदनशीलता दाखविली नाही तर स्वातंत्र्य आंदोलन, सामाजिक चळवळीत ते संघर्षशील, खंबीर राहिले. जेव्हा स्वातंत्र्यानंतरही भारतीय माणूस सुखी झाला नाही, म्हणून ते निराश झाले, त्यांच्या आत्महत्येमागे करूणा आणि समाजनिष्ठा होती. त्यांनी १५० पुस्तके लिहिली आणि समाजाला संस्कारित केले, त्यांची वैचारिक झेप समजून घेतली पाहिजे. असे सांगून त्यांनी आजच्या शिक्षण व्यवस्थेवर बोट ठेवले. यावेळी गट शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, प्राचार्य शेळके यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन प्रा. आदिनाथ जोशी यांनी केले तर आंतरभारती शाखा सचिव लेविन भोसले यांनी आभार मानले.
*वृत्त विशेष सहाय्य
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११