shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज इंदापूर येथे शिक्षक दिन साजरा.

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज इंदापूर येथे शिक्षक दिन साजरा. 
इंदापूर: ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज इंदापूर येथे अनुसया सामाजिक संस्थेच्या वतीने शिक्षक  दिनानिमित्त    शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला 
  या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अविनाश ननवरे उपस्थित होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष  सागर मिना माणिक जाधव,प्राचार्य , अश्विनी शिंदे , शिक्षिका रंजना राऊत ,मयुरी मालशिकारे ‌ तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुन्यांचे स्वागत करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते  दीप प्रज्वलन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला . यानंतर सर्वांचा सन्मान करण्यात आला . 
  
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ. अविनाश ननवरे यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त व शिक्षक दिनानिमित्त आपल्या मनोगत माहिती दिली तसेच संस्थेचे संस्थापक  सागर जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. 
यावेळी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली .
close