श्रीरामपूर / प्रतिनिधी:
खातेदारांवर होणारा अन्याय किती सहन करायचा, बँक, फायनान्स, एनबीसी/पतसंस्था यांनी आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आंदोलनात सहभागी होऊन अन्यायविरुद्ध मुल संविधानिक अधिकार बचावाकरिता मुंबई येथे लढा उभारल्याचे व सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी प्रहार जनशक्तीच्या शीतल भाऊसाहेब गोरे यांनी सांगितले.
बँक,फायनान्स कंपन्या/एनबीसी/पतसंस्था यांचेकडून वारंवार होणाऱ्या त्रासामुळे तथा चुकीच्या कारभारामुळे महाराष्ट्रातील शेतकरी,कर्जदार यांच्यावतीने नुकतेच आझाद मैदान मुंबई येथे तीन दिवस उपोषण व जन आंदोलन करण्यात आले. याबाबत संबंधित दोषींवर शासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्रातील शेतकरी, कर्जदार मोठ्या संख्येने उपोषणास बसले होते.
या उपोषण आंदोलनाचे विविध संघटनानी नेतृत्व केले होते.कर्ज घेणे हा काही गुन्हा नाही, प्रत्येक माणसाची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने त्याला कर्ज घ्यावे लागते. काही कारणामुळे कर्ज रक्कम भरणे शक्य होत नाही अशांना बँका, पतसंस्था खातेदारांना आत्महत्या करायला लावणारी परिस्थिती निर्माण करतात. त्यासाठी मुख्यमंत्री यांनी याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.मोतीलाल होम फायनान्स उर्फ एस्पायर होम फायनान्स लिमिटेड, यांचे बाबत माहिती दिली. तसेच श्रीरामपूर येथील एका महिला पतसंस्थाकडून मनमानी कारभार होत असून त्याचा त्रास अनेक सभासदांना झाला आहे. सभासदांना वार्षिक सभेला निमंत्रण न देणे,सोने तारण कर्जदारांना माहिती न देता परस्पर लिलावाने विल्हेवाट लावणे,संचालक मंडळाची निवडणूक न घेता थेट मंडळ, चेअरमन नियुक्त करणे,ह्या नियमबाह्य बाबी आहेत.
दि.३० सप्टे.रोजी वार्षिक सर्व साधारण सभा असल्याने यावेळी अनेक सभासद आपल्या विविध समस्या मांडणार असून ही सभा गाजणार आहे.या संदर्भात अनेकांनी तक्रारी आ.बच्चू कडू यांना निवेदनाद्वारे देण्यात आलेल्या आहेत.सदर पतसंस्थेच्या मनमानी कारभार विरोधात महात्मा गांधी पुतळ्यासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार श्रीरामपूर,सहाय्यक निबंधक, उद्योजक अशोक कानडे यंच्या मध्यस्थीने उपोषण स्थगित करण्यात आले होते.अद्याप सहाय्यक निबंधक श्रीरामपूर यांचेकडून निर्णय, कारवाई न झाल्याने श्रीमती शीतल गोरे यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पा.यांची मुंबईत भेट घेऊन निवेदन दिले.व सहकार मंत्री यांनी सहकार आयुक्त यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले असे गोरे यांनी सांगितले आहे.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर - ९५६११७४१११