श्री क्षेत्र गणेशखिंड येथील वरद गजानन उत्सव सोहळा
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
छत्रपती संभाजी महाराज स्वाभिमानी व अभिमानी होते. त्यांना माहीती होते की धर्म बुडाला तर जगातील सुख नाहीसे होईल म्हणून त्यांनी धर्मासाठी देह बलीदान केला पण धर्म सोडला नाही म्हणूनच त्यांना धर्मवीर असे संबोधले जाते. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचे रक्षण केले म्हणून आज आपल्यां मंदिरांना कळस आहे अन् दारात तुळस आहे, आपल्या सुवासिनींच्या कपाळाला कुंकू आहे अन् गळ्यात तुळशीची माळ आहे असे प्रतिपादन परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील विनोदाचार्य विलास महाराज गेजगे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर तालुक्याच्या पुर्वभागातील भाविकांचे श्रद्धास्थान व जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या श्री क्षेत्र गणेशखिंड येथे सुरू असलेल्या वरद गजानन उत्सव सोहळ्यात किर्तनरूपी सेवेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्रीक्षेत्र आंबेजोगाई येथील मुकूंदराज स्वामी संस्थान अध्यक्ष व गणेशखिंड देवस्थानचे विश्वस्त किसन महाराज पवार, कृष्णा महाराज वाघुले, संदिप महाराज जाधव, लक्ष्मण महाराज नांगरे, सचीन महाराज पवार, निवृत्ती महाराज विधाटे, परमेश्वर महाराज भारत, सागर सर, अॅड. रंगराव गुजर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाषराव पटारे, देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब ओझा, सचीव बजरंग दरंदले, विश्वस्त दत्तात्रय पवार, शिवाजी पवार, भाऊसाहेब कोकणे, कल्याणराव लकडे, शनैश्वर पवार आदिंसह मान्यवर व्यासपिठावर उपस्थीत होते.
गोठ्यातल्या गायीला, आपल्या आई व बापाला जीव लावा, त्यांना सांभाळा, गळ्यात तुळशीची माळ घाला जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या खांबाला ज्ञानेश्वर महाराजांनी पाठ देवून ज्ञानेश्वरी सारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ जन्माला घातला त्या खांबासाठी मंदिर असलेला जिल्हा व ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदविले त्या खांबाचे व रेड्याचे मंदिर याच जिल्ह्यातील आहे. जेथे माऊली पाठ दिली त्या खांबाचा इतका थाट आहे तर ज्यांनी समोर बसून ज्ञानेश्वरी लीहीली त्यांचा कीती थाट व कीर्ती असेल याची कल्पना करा. अवघ्या विश्वात रेड्याचे मंदिर व एका खांबासाठी मंदिर असलेला जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्हा होय अशा या जिल्ह्यात श्रीक्षेत्र देवगडचे महंत किसनगीरीबाबा, शांतीब्रम्ह गुरूवर्य भास्करगीजी महाराजांचा, गंगागीरी व नारायणगीरीजी महारांजासारख्या महात्म्याचा सहवास लाभला अशा जिल्ह्यात तुम्ही सर्वांनी जन्म घेतला तुम्ही सर्वजण खरचं भाग्यवान आहात म्हणूनच इतरत्र गणशोत्सवात धांगडधिंगा होत असताना मात्र श्रीक्षेत्र गणेशखिंड सारख्या ठिकाणी इतका मोठा भव्य सप्ताह होत आहे.
ज्या प्रमाणे संसार कराताना उर्जा असावी लागते त्या प्रमाणे परमार्थ करताना ही उर्जा असावीच लागते, किर्तनाचे जागी किर्तनच झाले पाहीजे. किर्तनात आनंद निर्माण होणे हाच खरा परमार्थ आहे. जीवनात सेवेला फार महत्व आहे. ज्यांचेकडून गणपती बाप्पाची सेवा घडते त्यांना कुठलेही भय नाही. साधु संतांची, गावाची, आई व वडीलांची सेवा करा, गळ्यात तुळशीची माळ घाला त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. वाईटाची कुणीच किंमत करत नाही अन् चांगल्याची कुठेही जा किंमत व कीर्ती वाढल्याशिवाय राहणार नाही असे ही यावेळी विनोदाचार्य विलास महाराज गेजगे यांनी सांगीतले.
यावेळी अशोकचे माजी संचालक रामदास पटारे, गुजरवाडीचे सरपंच अमोल गुजर, भागवतराव चितळकर, साहेबराव पटारे, सोपानराव गुरसळ, भास्करराव तुवर, नानासाहेब पारखे, विठ्ठलराव होन, भागवतराव पटारे, कारभारी तागड, रामभाऊ कवडे, दत्तात्रय पटारे, जालींदर होले भजनी मंडळ आदिंसह मोठा जनसमुदाय उपस्थीत होता. आज येथे खिर्डी येथील अशोकचे माजी चेअरमन भास्करराव पवार, टाकळीभान येथील रावसाहेब पवार यांनी महाप्रसादाचे अन्नदान केले, या सोहळ्याचे सुत्रसंचालन व आभार शनैश्वर पवार यांनी मानले.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
श्रीक्षेत्र गणेशखिंड येथे सुरू असलेल्या वरद गजानन उत्सव सोहळ्याप्रसंगी किर्तनरूपी सेवेत विनोदाचार्य विलास महाराज गेजगे समवेत किसन महाराज पवार, कृष्णा महाराज वाघुले, संदिप महाराज जाधव, लक्ष्मण महाराज नांगरे, सचीन महाराज पवार, निवृत्ती महाराज विधाटे, परमेश्वर महाराज भारत, महेश महाराज, बाळासाहेब ओझा, बजरंग दरंदले, दत्तात्रय पवार, कल्याणराव लकडे, शिवाजी पवार आदिंसह मान्यवर, भजनी मंडळ व उपस्थीत जनसमुदाय दिसत आहे.(छाया - भानुदास बेरड)
श्रीक्षेत्र गणेशखिंड येथे सुरू असलेल्या वरद गजानन उत्सव सोहळ्याप्रसंगी किर्तनरूपी सेवेत विनोदाचार्य विलास महाराज गेजगे समवेत आदिंसह मान्यवर, उपस्थीत जनसमुदाय व भजनी मंडळ दिसत आहे.(छाया - भानुदास बेरड)