भोकर ग्रामपंचायतीतील सत्ताधारी
कानडे - ससाणे गटाला घरचा आहेर
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
तालुक्यातील भोकर ग्रामपंचायतीने गावातील विविध विकास कामाच्या निवीदा ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांना विचारात न घेता व गावातील इतर ठेकेदारांना सदरच्या कामाच्या निवीदा फार्म व कामाचे अंदाजपत्रक उपलब्ध करून न दिल्याने या कामात गैरव्यवहार होण्याची शक्यता असल्याने सदरच्या बी १ निवीदा रद्द करून फेर निवीदा काढण्यात याव्यात या करीता येथील प्रमुख मान्यवरांनी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन दिल्याने ही विकास कामे वादाच्या भोवर्यात सापडत असतानाच सत्ताधारी गटाच्या प्रमुखांनी निवेदन दिल्याने सत्ताधारी आमदार कानडे व ससाणे गटाच्या ताब्यातील ग्रामपंचायतीला वरिष्ठांचा घरचा आहेर मिळाल्याचे दिसत आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर ग्रामपंचायतीत सुमारे आठ महिण्यापुर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत तत्कालीन सत्ताधारी माजी आमदार भानुदास मुरकूटे व करण ससाणे गटाच्या लोकसेवा मंडळाचा पराभव करत येथे आमदार लहु कानडे व करण ससाणे गटाने परीवर्तन घडवून आणलेले आहे. या निवडणुकीत दोनही गटांनी गावचा विकास साधण्यासाठी युवा नवे उमेदवार दिले. मतदारांनी ही मोठ्या अपेक्षेने येथे सत्तेचे परीवर्तन घडवून आणले पण काही महिण्यातच येथील विकास कामे वादात जावू लागले, त्यात विद्यमान सदस्य मंडळाने हाती घेतलेल्या कामातील पहीलेच काम म्हणजे घनकचरा निर्मूलन प्रकल्प, या प्रकल्पाच्या माध्यमातून आता गावातील केर कचरा गावाबाहेर जावून गाव स्वच्छ होणार व रोगराई पासून ही बचाव होणार अशी सर्वांनाच अपेक्षा होती परंतू सदरचे काम पुर्ण होवून ही ते अपुर्ण असल्याने हा प्रकल्प सध्या तरी अकार्यान्वीत असतानाही केवळ पंचाायत समीतीच्या अधिकार्यांनी काम पुर्ण झाल्याचा दाखला दिला अन् संबधीताचे बील अदा झाले, प्रत्यक्षात यापुर्वीच्या ग्रामसभेत हे काम पुर्ण झाल्याशिवाय संबधीतांची रक्कम अदा करू नये असा ठराव झालेले असतानाही रक्कम अदा झाल्याने व प्रकल्प अकार्यान्वीत असल्याने हे काम वादात सापडल्याचे दिसत आहे.
त्यातच या नुतन सरपंच व सदस्य मंडळाने गेल्या काही दिवसांपुर्वी दलीत वस्ती अंतर्गत दोन व १५ व्या वित्त आयोगातून आठ कामे करण्याचा निर्णय घेतला. सदरच्या कामाचे बी १ टेंडर काढण्याचे ठरले प्रत्यक्षात येथे काम करण्यासाठी इच्छूक असलेल्या व गावातील इतर ठेकेदारांपर्यत हा विषय जावू न देता नेहमीच्या ठेकेदारास सदरच्या कामांची माहीती देवून त्यास बी १ निवीदा फार्म देवून कामाचे अंदाज पत्रक उपलब्ध करून देण्यात आले, परंतू या कामाची माहीती सत्ताधारी गटातील प्रमुख गाव नेत्यापर्यंत व इच्छूक ठेकेदारापर्यंत पोहचली अन् ही विकास कामे व निवीदा प्रक्रीया वादाच्या भोवर्यात सापडली.
हा प्रकार सत्ताधारी गटाचे गावातील प्रमुख नेत्यांपर्यंत पोहचल्यानंतर या विकास कामांची माहीती गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्यांसह इतर ठेकेदार, मजूर संस्थांना माहिती न देताच प्रक्रीया सुरू झाल्याचे समजताच येथील आमदार कानडे - ससाणे गटाचे प्रमुख असलेले भिकाजी पोखरकर, काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष सुदामराव पटारे, ग्रामपंचायत सदस्य संदिप गांधले,आप्पासाहेब जाधव यांचेसह सोसायटीचे माजी चेअरमन दिलीप पटारे, भाऊसाहेब पटारे, नामदेव शिंदे, गणेश कांबळे, वेणुनाथ डूकरे, सागर अभंग, सचीन पोखरकर, राजेंद्र विधाटे, लहानभाऊ विधाटे, सम्राट माळवदे आदिंच्या सह्याच्या निवेदनाद्वारे या विकास कामात गैरव्यवहार होण्याचा संशय घेत ही कामे पारदर्शी होण्यासाठी फेर निवीदा काढण्यासाठी लागलीच सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचेकडे मागणी केली.
प्रत्यक्षात सत्ताधार्यांच्या गावातील प्रमुखांनी आपल्याच गावातील कामे पारदर्शी होण्यासाठी ताब्यातील ग्रामपंचायतीच्या विरोधात निवेदन देण्याचा हा पहीलाच प्रकार असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
या निवेदनाच्या प्रति संबधीतांनी ग्रामपंचायती बरोबरच आमदार लहु कानडे व पंचायत समीतीत दाखल केल्याने सत्ताधारी असलेले सरपंच, उपसरपंच व सदस्य काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे यांना निवेदन देताना परीवर्तनचे प्रमुख असलेले भिकाजी पोखरकर रामदास शिंदे, सुदाम पटारे, गणेश कांबळे, भाऊसाहेब पटारे, दिलीप पटारे, सचीन पोखरकर, सुनिल विधाटे, राजेंद्र विधाटे, आप्पासाहेब जाधव, ऋषीकेष झिने, संदिप गांधले, सागर अभंग, सम्राट माळवदे व लहानुभाऊ विधाटे आदि उपस्थीत होत
*भोकर - येथे विकास कामात गैरव्यवहार होवू नये व पारदर्शी कारभार होण्यासाठी विविध विकास कामांच्या फेरनिवीदा काढ्णयाचे निवेदन देताना भिकाजी पोखरकर, रामदास शिंदे, सुदाम पटारे, गणेश कांबळे, भाऊसाहेब पटारे, दिलीप पटारे, सचीन पोखरकर, सुनिल विधाटे, राजेंद्र विधाटे, आप्पासाहेब जाधव, ऋषीकेष झिने, संदिप गांधले, सागर अभंग, सम्राट माळवदे व लहानुभाऊ विधाटे आदि दिसत आहेत.*
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११