शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
काल दिनांक ०७ सप्टेंबर रोजी शिर्डी येथे समर्थ प्रतिष्ठान,शिर्डी आयोजित “समर्थ गौरव पुरस्कार” सामाजिक कार्यकर्ते व प्रतिथयश व्यावसायिक श्री.योगेशशेठ तिया यांना राज्याचे महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते देण्यात आला. योगेशशेठ हे मी साईचासेवक ह्या नावाने राज्यभरात प्रसिद्ध आहेत. त्यांची साईबाबाचरणी असलेली श्रद्धा व स्वभावात असलेल्या सबुरीमुळे त्यांनी यशाचे टोक गाठले व आज ते शिर्डी, गणेशपुरी, नाशिक,ठाणे,मुंबई अश्या विविध ठिकाणी आपल्या व्यावसायिक व सामाजिक कार्यात योगदान देत आहेत.
त्यांनी नुकतेच श्रीक्षेत्र गणेशपुरी येथे तानसा टेंपल व्ह्यू नावाने हॉटेल व्यवसाय उभारला असून त्याच ठिकाणी ते गेल्या अनेक वर्षांपासून अन्नदान सेवा देखील करत असतात. कोरोनाकाळात देखील त्यांनी दानशूरता दाखवत रुग्णवाहिका दिली होती. विविध मंडळे,संस्थांच्या पाठीशी भक्कम पणे उभे रहात ते आर्थिक योगदान देतात. राज्यभरात मोफत रुग्णसेवा करणाऱ्या लोकसेवा प्रतिष्ठानचे ते प्रमुख सल्लागार असून मुख्यमंत्री सहाय्यता, विविध आरोग्य विषयक शासकीय योजनांद्वारे असंख्य रुग्णांना त्यांनी ह्या माध्यमातून मदत देखील मिळवून दिली आहे. पुण्यभूमी शिर्डी येथे सन्मान प्राप्त होते हे माझ्यावर प्रेम करणाऱ्यांचे आशीर्वादच असल्याचे श्री.योगेशशेठ तिया यांनी मनोगत व्यक्त करत समर्थ प्रतिष्ठान आणि मंत्री नामदार विखे पाटील व निलेशदादा कोते पाटील समर्थ प्रतिष्ठान यांचे आभार मानले.