गणोशोत्सवही हर्ष उल्हासात साजरा
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : दरेवाडी येथे गणेश उत्सव व गणेश मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा दि . १५ सप्टेंबर रोजी मोठया उत्साहात व आनंदात करण्यात आला . या निमित्त दरेवाडी येथील आझाद चौक पावन गणपती मंदिर येथे आझाद मित्र मंडळातर्फे सत्यनारायण महापूजा व ह. भ. प. सचिन महाराज जपकर यांचा जाहीर कीर्तन सोहळा आयोजीत करण्यात आला .
या कार्यक्रमाला सर्व गणेशभक्तांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला . सर्व गणेश भक्तांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता . सायंकाळी ७ ते ९ हरी कीर्तन संपन्न झाले व त्यानंतर सर्व गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .
आझाद मित्र मंडळाचे युवक नेहमीच सामाजिक उपक्रम राबवितात . गावातील अनेक गरजुंना या युवकांनी आर्थिक मदत केली आहे . समाज कार्यात नेहमीच पुढे असणारे आझाद मित्र मंडळाचे युवक कोणताही गाजावाजा अथवा नावाची प्रसिद्धी न करता समाज कार्य करत आहेत याची दखल प्रशासन नक्कीच घेईल अशी कौतुकाची थाप नागरिकांमधुन व्यक्त केली जात आहे .