shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला ११ लाखांचे बक्षीस; शिंदेसेनेच्या आमदाराचे बेताल वक्तव्य...!


मुंबई:-
राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देऊ, असे धक्कादायक विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. या विधानावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे.

शिवसेना शिंदे गटातील आमदार सातत्यानं वादग्रस्त कारणाम्यामुळे चर्चेत असतात. त्यात बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड ( Sanjay Gaikwad ) यांचा प्रथम क्रमांक आहे. धमक्या देणे, मारहाण करणे, अशा गोष्टींसाठी ते कुप्रसिद्ध आहेत. आपल्यातील गुंड प्रवृत्तीचं ओंगाळवाणे प्रदर्शन आमदार गायकवाड यांनी सातत्यानं केलं आहे.

राहुल गांधी यांना मागासवर्गीय आदिवासीसह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचे आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करून त्यांच्या मनातील ओठावर आले. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे, असे म्हणत जो राहुल गांधीची जीभ छाटेल, त्याला ११ लाखांचे बक्षीस देणार, असे आक्षेपार्ह धक्कादायक विधान आमदार संजय गायकवाड यांनी केले. एकीकडे भाजपने राहुल गांधींविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असतानाच आता संजय गायकवाड यांच्या या विधानावरुन महायुती लवकरच बॅकफूटवर येण्याची शक्यता दिसत आहे.
close