इंदापूर:महाराष्ट्र राज्य युवक क्रीडा संचालनालय व जिल्हा क्रीडा विभाग पुणे यांच्या माध्यमातून वाघीरे महाविद्यालय सासवड या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धात इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी ता. इंदापूर विद्यालयातील मुलीच्या संघास प्रथम क्रमांक मिळाला. या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान चे माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी ता. इंदापूर येथील विद्यालयाच्या मुलीच्या व्हॉलीबॉल संघाने १७ वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक मिळवला. विद्यालयातील समृद्धी चांदगुडे ,श्रावणी चांदगुडे, साक्षी साळुंके ,तन्वी साळुंके, प्रणाली पवार, वर्षा काळे ,स्नेहा जगताप या मुलींचा संघात सहभाग होता.
संस्थेचे अध्यक्षा आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम ,सचिव वीरसिंह रणसिंग,विश्वस्त शिवाजीराव रणवरे , कुलदीप हेगडे, शंकरराव रणसिंग, विरबाला पाटील,राही रणसिंग,मुख्याध्यापक प्रमोद भोंग,क्रिडा मार्गदर्शक किरण पवार, विद्यालयाचे शिक्षक लक्ष्मण पानसरे ,तंटामुक्ती अध्यक्ष लालासो साळुंके,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंकुश पवार ,प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पवार, विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी संघातील खेळाडू चे अभिनंदन केले.