प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ५/ करमाळा तालुक्यातील राजुरी येथील "गोविंदपर्व" गुळ कारखाना, शेतकरी थकीत ऊस बिलाचा व प्रा. रामदास झोळसर यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसुन, आम्ही येत्या " दीड" महिन्यात बिल देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे मत गोविंदपर्व कारखान्याचे संचालक श्री. लालासाहेब जगताप सर यांनी आज ०४ संप्टेंबर रोजी करमाळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. गोविंदपर्व गुळ कारखाना हा शेतकरी हितासाठी राजुरी येथे सुरू करण्यात आला होता. यामध्ये कारखाना सुरळीतपणे चालवण्यासाठी जावई प्रा. रामदास झोळ सर आणि कन्या सौ मायाताई झोळ मॅडम यांनी वेळोवेळी सहकार्य करण्याचे काम केले. गळीत हंगाम २०१८-१९ मध्ये ऊसाचे प्रमाण कमी असल्याकारणाने सदर गळीत हंगामात फक्त २३३४८ टन गाळप झाले होते. त्यातील काहींचे रुपये २०००/- प्रमाणे बिले अदा केलेली आहेत तर कांहीं शेतक-यांचे रुपये १५००/- प्रमाणे बिले अदा केलेली आहेत. उर्वरित ५००/- रुपये प्रमाणे सुमारे ८० ते ९० लाख रक्कम देणे बाकी आहे. तसेच कारखान्याची वाहतूकदार वाहन मालकाकडून उचल येणे बाकी आहे. आमची बँकेकडे सध्या ५० एकर जमीन तारण आहे. त्यातील स्वमालकीची काही जमीन विक्री करून आम्ही रक्कम देणार असल्याचे लालासाहेब जगताप सर यांनी सांगितले. बँकेचे आमचे सेटलमेंट झालेले असून आम्ही लवकरच बिल देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राजकीय रंग आणण्याचे प्रयत्न चालू आहे. कारखाना तोट्यात असल्याने बंद आहे. बँकेचे सेटलमेंट करून शेतकऱ्यांना बिल देणार आहोत. आम्ही सर्व शेतकऱ्यांना एक हप्ता दिलेला आहे. तसेच वेळोवेळी ज्या शेतकऱ्याने मुलांच्या शिक्षणासाठी किंवा काही अडचणीच्या वेळी थेट माझ्याशी संपर्क साधला त्यांची काही बिल मी स्वतः अदा केलेली आहेत. वरील राहिलेले पैसे किरकोळ असून स्वतःच्या मालकीची काही एकर जमीन विकुन बिल देणार आहोत. शेतकऱ्यांऐवजी काही वेगळ्या गोष्टीत स्वारस्य असणान्या व्यक्तींना ऐन विधानसभेच्या वेळेस शेतकऱ्यांच्या बिलाची आठवण झाली आहे. प्रा. रामदास झोळ सर यांचा याच्याशी कसलाही संबंध नाही. आम्हाला शेतकऱ्याचे पैसे बुडवायचे नाहीत. आतापर्यंत एकाही व्यक्तींने आमच्याकडे तक्रार केलेली नाही. केवळ विधानसभेला प्रा. रामदास झोळ सर निवडणूक लढवणार असल्याने राजकीय वैमनस्याच्या भूमिकेतुन व केवळ ते आमचे जावई असल्याने विनाकारण त्यांना यात ओढण्याचा प्रयत्न काही राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांच्या हस्तकामार्फत चालू आहे. केवळ ८० ते ९० लाख रुपये देणे आहे. करमाळा तालुक्यातील राजुरी येथील गोविंदपर्व कारखाना उर्वरित असणारे बिल दिड महिन्यात देणार असल्याचे जगताप सर यांनी सांगितले.
गोविंद पर्व अ़ॅग्रो गुळ कारखान्याचे शेतकऱ्याचे उर्वरित बिल दीड महिन्यामध्ये देणार असल्याचे लालासाहेब जगताप सर यांनी सांगितले आहे. त्यांच्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करत असून गोविंदपर्व बरोबरच करमाळा तालुक्यातील आदिनाथ, मकाई, भैरवनाथ, कमलाई साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची, कामगार, वाहन मालकांचे पैसे त्वरित द्यावे तसेच शेतकरी, कामगार, वाहन मालकांचया नावावरती कारखानदारांनी ऊचलेली कर्जे त्वरित भरावी अशी शेतकरी कामगार हिताची आमची भूमिका असून त्यांनी वेळेत पैसे न दिल्यास व कर्जाची रक्कम न भरल्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे यांनी व्यक्त केले आहे.