shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

आ.नमिता मुंदडा यांनी केले मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन!!

प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी

राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" सुरु केली असून यासाठी केज मतदारसंघातील ज्येष्ठ नागरीकांना लाभ घेण्याचे आवाहन आ.नमिता मुंदडा यांनी केले आहे.



गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे व कोणी सोबत नसल्याने तसेच पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांची तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही. यासाठीच राज्य शासनाकडून मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे.   यातंर्गत राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची, दर्शनाची संधी देण्यात येत आहे. त्याकरिता प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती रुपये 30 हजार (अक्षरी रुपये तीस हजार फक्त) इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश राहील यासाठी काही निकष आहेत.


पात्रतेचे निकष


महाराष्ट्र राज्यातील 60 वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिक. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 2 लाख 50 हजारापेक्षा जास्त नसावे. वैद्यकीय अधिकाऱ्यांने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारिरीक दृष्ट्या  निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे.


                             योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे


    योजनेच्या लाभासाठी दिनांक 31 ऑक्टोबर 2024 पूर्वी ऑफलाइन अर्ज तदनंतर ऑनलाईन अर्ज. लाभार्थ्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र. महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे, केशरी रेशन कार्ड. वैद्यकीय प्रमाणपत्र. पासपोर्ट आकाराचा फोटो. जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक. सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. सदर योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया पोर्टल. मोबाईल ॲप द्वारे. सेतू सुविधा केंद्रावर ऑनलाईन भरले जाऊ शकतात.


मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन केज मतदारसंघाच्या आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी केले आहे.

close