.
कळस (प्रतिनिधी): कीर्तनाचे बाजारीकरण होत असल्याने आज वारकरी संप्रदायकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. असे परखड मत अगस्ती पायी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष ह.भ.प. राजेंद्र महाराज नवले यांनी व्यक्त केले.
अमृतवाहिनी प्रवरामातेच्या तीरावर वसलेल्या ब्रह्मलीन प.पू. सुभाष पुरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्री क्षेत्र कळस बु येथे ऋषिपंचमी ते वामन जयंतीपर्यंत आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे प्रथम किर्तन रुपी पुष्प
"कली युगा माजी करावे किर्तन, तेणे नारायण येईल भेटी..."
या संत तुकाराम महाराज यांच्या नामाचा महिमा सांगणाऱ्या अभंगावर गुंफताना बोलत होते.
श्री. नवले महाराज म्हणाले की, भगवत प्राप्ती साठी नाम साधना केली तर भगवान आपले भेटीस येईल नाम साधने व्यतिरिक्त इतर साधने फोल असून नाम साधना मुळे आपलं जीवनाचे साध्य होईल.
वारकरी संप्रदाय आज जो उभा आहे तो नाम साधने वर आहे. कर्म, उपासना, ज्ञान, योग याच्या मार्फत देवा पर्यंत पोहचता येते.
अन्न ,पाणी, हवा, शेती दूषित झाली आहे त्यामुळे आरोग्यासाठी काम करावे लागेल. ज्याच्या दारापुढे गावठी गाय नाही त्यांना हिंदू म्हणून घ्यायचा अधिकार नाही म्हणून दारा पूढे गावठी गाय पाळावी आपण सुधारलो तर जग सुधारेल, भारतात अन्नाची खूप नासाडी होते. घरा घरात कॅन्सर सारखा आजार येणार आहे. असेही मत व्यक्त केले.
दुपारी ह.भ.प. संस्कृतीताई वाकचौरे यांचे प्रवचन झाले. मृदुंगाचार्य संकेत महाराज आरोटे, अगस्ती देवस्थानचे विश्वस्त गणेश महाराज वाकचौरे, गायनसम्राट अरुण महाराज शिर्के, अनिल महाराज रुपवते, प्रवीण महाराज पांडे, कळसेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त देवराम महाराज वाकचौरे, हार्मोनियम वादक सूर्यकांत ढगे यांनी संगीत साथ दिली.