श्रीरामपूर / प्रतिनिधी:
तालुक्यातील सर्व माजी सैनिकांसाठी काम करणारी सक्षम संघटना असावी अशी अनेक दिवसांपासून अनेक ज्येष्ठ माजी सैनिकांची इच्छा होती त्याच अनुषंगाने शहरातील शिवपार्वती मंगल कार्यालय याठिकाणी ज्येष्ठ माजी सैनिक सुधाकर हरदास यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.बैठकीत नवीन स्थापन करण्यात आलेल्या संघटनेचे नाव सर्वांनुमते आजी - माजी सैनिक संघर्ष समिती श्रीरामपूर असे ठेवण्यात आले व सर्वानुमते बाळासाहेब भागडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
याप्रसंगी अनेक माजी सैनिकांनी समितीच्या हिताचे महत्त्वाचे मुद्दे मांडले, नवनिर्वाचित समिती अध्यक्ष श्री.भागडे यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर हरदास, बाळासाहेब बनकर, चांगदेव धाकतोडे ,संपतराव लगड, संग्राम यादव, मेजर कृष्णा सरदार, सुरेश बोधक, यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणामध्ये हरदास म्हणाले की,संघटना जिवंत ठेवायची असेल तर महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात ठेवले पाहिजेत, सातत्याने माजी सैनिकांच्या सुखा दुखात सहभागी होणे, सैनिकावर अन्याय झाल्यास त्याला न्याय मिळवून देणे , संघटनेचा हिशोब ठेवणे , मिटिंगमध्ये सदस्यांना वेळोवेळी हिशोब वाचन करून दाखवणे, घेतलेल्या रकमेची पावती देणे ,मासिक मीटिंग ठेवणे, मागील झालेल्या मीटिंगचा तपशील वाचून दाखवणे, संस्थेचा पुढील अजेंडा काय असेल तो संघटनेच्या सदस्यांपुढे मांडणे या गोष्टी संघटनेंनी काटेकोर पालन न केल्यामुळे अनेक संघटना बरखास्त झाल्या आहेत,
संघटनेने ठरवून दिलेले नियम व अटी जर काटेकोरपणे पाळल्या गेल्या तर संघटना नक्कीच उंच शिखर गाठू शकते असे ते म्हणाले.
मिटिंगसाठी तालुक्यातील राम म्हैस,मंगेश यादव, विलास खर्डे ,अशोक कायगुडे, श्रीमती ,प्रयाग जाधव, श्रीमती पार्वताबाई देसाई, अशोक साबळे, कैलास खंडागळे, बाळासाहेब कडनोर, संजय बनकर, चंदू बडाख ,संतोष देवराय, सुनील भालेराव, सुरेश बोधक, प्रवीण ससाणे, सुधाकर हरदास, चांगदेव धाकतोडे ,संग्रामजीत यादव, दिलीप तांबे ,माधव ढवळे , भगीरथ पवार, बाळासाहेब भागडे , सोपान हरदास, रमेश अहिरे, सोमनाथ ताके, बाळासाहेब बनकर , बाळासाहेब लोखंडे , बाळासाहेब खाकल,राजेंद्र कांदे ,अविनाश बनकर, संपत लगड, अमित देशमुख, राजेंद्र आढाव, सुनील गवळी, कृष्णा सरदार , रविंद्र कुलकर्णी अशा अनेक माजी सैनिक, वीरमाता ,वीर पत्नी मोठ्या संख्येने हजर राहुन एकीचं बळ दाखवले. मिटिंगचे सुत्रसंचलन मेजर कृष्णा सरदार, अध्यक्ष निवडीस अनुमोदन मेजर सुनील गवळी यांनी दिले, तर आभार प्रदर्शन मेजर संग्रामजीत यादव यांनी केले.
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११