शिक्षक भारती संघटनेच्या माढा तालुकाध्यक्षपदी संतोष आटोळे यांची निवड.
उपाध्यक्षपदी उल्हास उबाळे, सचिव पदी सचिन भोंग तर संघटक पदी प्रवीण जाधव यांची निवड.
इंदापूर:शिक्षकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या शिक्षक भारती संघटनेच्या माढा तालुका कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष सुजित कुमार काटमोरे आणि जिल्हा प्रवक्ते विजयकुमार गुंड यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली असून माढा तालुका अध्यक्षपदी नूतन विद्यालय कुर्डूवाडीचे संतोष भगवान आटोळे, तर उपाध्यक्षपदी पूज्य सुगंधाताई विद्यालय भुताष्टेचे उल्हास महादेव उबाळे यांची तसेच नूतन विद्यालय कुर्डूवाडी चे सचिन मधुकर भोंग यांची तालुका सचिवपदी व कुर्मदास विद्यालय लऊळचे प्रवीण शंकर जाधव यांची तालुका संघटकपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये माढा तालुका नूतन कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे, जिल्हा प्रवक्ते विजयकुमार गुंड, शहराध्यक्ष देवदत्त मेटकरी, उपाध्यक्ष आत्तार, जिल्हा संघटक शरद पवार यांनी सर्व नूतन माढा तालुका पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.त्याप्रसंगी शिक्षक भारती संघटनेचे सर्व जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी यांनी माढा तालुका नूतन कार्यकारणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे म्हणाले, शिक्षकांचे शासन स्तरावर कोणतेही काम प्रलंबित राहणार नाही यासाठी शिक्षक भारती संघटना पुढाकार घेत असून निस्वार्थपणे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर प्रवक्ते विजयकुमार गुंड म्हणाले संघटनेची ताकद काय असते हे शिक्षक भारतीचे शिक्षकांचे प्रश्न सोडवत असताना लक्षात येते त्यामुळे अनेक वर्ष प्रलंबित असलेली कामे सुटत आहेत.
यावेळी बोलताना माढा तालुका नूतन अध्यक्ष संतोष आटोळे म्हणाले, शिक्षक भारती संघटनेच्या माढा तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन शिक्षक भारती परिवाराने जो विश्वास टाकला आहे तो पूर्णपणे सार्थ ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निस्वार्थपणे भूमिका घेऊ तसेच संघटना वाढीसाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.
यावेळी उपस्थितांचे आभार नूतन सचिव सचिन भोंग यांनी मांनले.
-