shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

केज तालुक्यात लोकनाट्य कलाकेंद्राच्या गोंडस नावाखाली सुरू आहे वेश्याव्यवसाय !!

                        

प्रकाश मुंडे /बीड जिल्हा प्रतिनिधी                           

केज तालुक्यात लोकनाट्य कला केंद्राच्या गोंडस नावाखाली सर्रासपणे  वेश्याव्यवसाय सुरु आहे. यामध्ये अनेक तरुणांची कलाकेंद्रावाल्या कडून लूट केली जात आहे.     दोन वेळेस पोलिसांचा छापा पडुन देखील हे केंद्र चालु कशे आहेत हा मोठा प्रश्न आहे. कलेच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची तक्रार.
मांजरसुंबा ते केज दरम्यान तीन कला केंद्र आहेत. सध्या केज तालुक्यात अवैद्य धंद्याने उच्छाद मांडला आहे . अवैध दारू विक्री ,मटका ,लॉजवरील वेश्या व्यवसाय आणी हे कला केंद्र लोकनाट्य कलेच्या नावाखाली सरळसरळ वेश्याव्यवसाय करून घेतला जातो. 

अल्पवयीन मुलीकडुन डान्स करून घेतला जातो, बैठकीत शौकीन लाखो रुपयांची उधळपट्टी करतात . या नादा पायी आनेक ग्राहकांचा संसार मोडला यात सर्व वयातील ग्राहक जातात ,त्यात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर व्यसनात अडकला आहे. यासाठी पैसा कमावण्यासाठी वाममार्गाने  पैसा कमावत आहेत .

तालुक्यातील तीन तरुणांनी महाराष्ट बँकेतून ऑनलाइन पद्धतीने पन्नास लाख रुपयांची चोरी केली होती .हा सर्व पैसा हया कला केंद्रा मध्ये उडवल्याची माहिती पोलिसात गुन्हा दाखल झाल्या नंतर या तरुणांनी पोलिसांना दिली .अटक झाल्या नंतर बँकेचा पैसा परत बँकेला करण्या साठी या तिघांनापण शेती विकावी लागली होती .

या कला केंद्राच्या व्यसना पायी अनेकांचा संसार मोडत आहे ,काहींचा मोडला आहे , अनेक जण कर्जबाजारीपणा मुळे आत्महत्या करत आहेत .मध्यंतरी उपअधिशक अखिलेशकुमार यांनी तिन्हीकेंद्रावर छापा मारून यांचे लायसन्स रद्द केले होते. मात्र मागील काही दिवसापासुन हे केंद्र परत सुरू झाली आहेत .

पोक्सोसारखे गुन्हे दाखल होऊन ही या कला केंद्रांना परवानगी कोणी व कशी दिली हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाना पडत आहे. राजकारणी व पोलीस प्रशासन या व्यवसाया कडे डोळेझाक करत आहेत.  चार लोकांचे हित सांभाळण्या पेक्षा अनेकांचे संसार कसे वाचतील या कडे पोलीस प्रशासनाने  लक्ष देण्याची नागरिकांची मागणी आहे.
close