shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

जामखेड येथे भटके विमुक्त दिन मोठया उत्साहात साजरा

जामखेड :-
 जिल्हास्तरीय अखिल भारतीय भटके विमुक्त  दिना निमित्त  31 ऑगस्ट रोजी जामखेड येथे मा. जिल्हा अध्यक्ष श्री रमेश (अण्णा) धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता मार्गदर्शन व भटके विमुक्त मेळावा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारिणी तयार करण्यात आली , संघटनेची भूमिका व जबाबदारी यावर सर्वांनी आपआपले मत मांडले  व शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटका पर्यंत कसा पोहचेल यावर विचार विनिमय करून जातीचा दाखला मिळण्यासाठी ज्या जाचक अटी आहेत यावर चर्चा झाली, सर्वांना हक्काचे घरकुल मिळाले पाहिजे, येणाऱ्या काळात जे शासन आपल्याला न्याय देईन व आपले हक्क जाणून घेईन त्याच  योग्य उमेदवाराची निवड करायची व  त्यास सर्वतोपरी मदत  करायची यावर सविस्तर मत मांडण्यात आले व नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत करण्यात आले.


     यावेळी जिल्हाध्यक्ष श्री रमेश धोत्रे, नगरसेवक श्री मोहन (वस्ताद) पवार, नगरसेवक श्री संदीप (भाऊ) गायकवाड, तालुका अध्यक्ष श्री नवनाथ जाधव, शहराध्यक्ष श्री मच्छिंद्र पवार, तालुका उपाध्यक्ष  मच्छिंद्र येवले,शहर उपाध्यक्ष श्री राजेंद्र शेलार,  प्रमुख पाहुणे श्री विकास मस्के (मेजर), कार्यक्रमाचे अध्यक्ष समाधान आंबेडकर(महाराज),  ह.भ.प. ऐडव्हो. महारुद्र नागरगोजे, श्री शंकर लोखंडे,श्री  सोनू परमाळ, अजिनाथ चव्हाण, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष श्री नवनाथ मोतेकर, कर्जत तालुका अध्यक्ष श्री हनुमंत म्हेत्रे,  श्रीमती शीतल परमार मॅडम, श्रीअभिमान खाडे, श्री जयेश कांबळे (CRHP) श्री महेश डोके,श्री दिलीप जाधव,श्रीविजय धोत्रे, श्री संजय पिटेकर, श्री जगदिश जाधव, श्री रोहन धोत्रे, श्री अमोल जाधव, श्री नाना जाधव, श्रीअण्णा विटकर, श्री संजय विटकर व इतर सामाजिक  कार्यकर्ते व बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री गोवर्धन जाधव यांनी प्रयत्न केले तर कार्यक्रमा चे सूत्र संचालन श्री नवनाथ जाधव(सर) यांनी केले आभार नगरसेवक मोहन (वस्ताद) पवार यांनी मांडले.
close