shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प.गट) केज शहराध्यक्षपदी शद्दु खतीब यांची निवड एकनिष्ठ तेची मिळाली पावती!

प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी!!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) केज शहर अध्यक्ष पदी सद्दाम (शद्दु) खतीब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार बजरंग बाप्पा सोनावणे यांनी त्यांची निवड केली .अंबाजोगाई येथे कार्यकर्ता मेळाव्यामध्ये माजी आमदार पृथ्वीराज साठे, ज्येष्ठ नेते बबन जाधव ,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर जाधव, केज न.प चे गट नेते भाऊसाहेब गुंड, गुलाब पठाण यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शद्दु खतीब यांना निवडीचे पत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. खासदार बजरंग बाप्पा यांच्याशी एकनिष्ठता आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधला जनसंपर्क यामुळे त्यांच्यावर आता शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

बजरंग बप्पा सोनवणे प्रतिष्ठान, छत्रपती अंगरक्षक इब्राहिम खान प्रतिष्ठान व अल सफा वेल्फेअर सोसायटी च्या माध्यमातून सामाजिक, संस्कृति व क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असे काम केलेले आहेत.  

आगामी काळात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि अधिकाधिकी तरुणांना राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सद्दाम (शद्दु) खतीब यांनी सांगितले. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या विचार धारेशी एकरूप राहून खा.बजरंग बप्पा सोनवणे यांना आदर्श स्थानी मानून पक्ष श्रेष्ठींनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरवून दाखवेल असं देखील सद्दाम (शद्दु) खतीब यांनी यावेळी म्हटले आहे.
close