शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
राजकीय बातमी
*आदिवासी विकास संघ (असो)महाराष्ट्र राज्याच्या वतीने आर्णी ता.जि.धुळे येथील दिलीप शिरसाठ यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची एकमताने धुळे तालुका संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली.
आदिवासींच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय असा सर्वांगीण विकास करण्यासाठी जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्राची गरज असल्याचे मत प्रा. मोतीलाल सोनवणे यांनी व्यक्त केले.आदिवासी विकास संघाचे युवा अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी प्रबोधन केले की,एका काडीला महत्त्व नाही तर पेंडीला आहे.एका व्यक्तीला महत्त्व नसून संघटनेला महत्त्व आहे. म्हणून जास्तीत जास्त आदिवासी युवकांनी संघटनेत प्रवेश करावा असे आवाहन केले.
यावेळी आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे, युवा अध्यक्ष प्रकाश चव्हाण, दगा कोळी, दिलीप शिरसाठ, निंबा शिरसाठ, संजय शिरसाठ, पृथ्वीराज शिरसाठ, भाईदास शिरसाठ, सदाशिव सूर्यवंशी, समाधान बागुल, हर्षल कोळी, श्रावण कोळी, संदीप कोळी, युवराज सोनवणे, युवराज माळी, सुदाम माळी, मुकेश शिरसाठ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.