shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीत शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा


विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिलेली विनयशीलता आणि आदर हीच सर्वोत्तम भेट आहे - प्रा.डॉ. अब्दुस सलाम

अहमदनगर / प्रतिनिधी:
जसा शिक्षणात दिवसां दिवस बदल होत आहेत. तसेच विद्यार्थ्यांत देखील बदल होत आहेत. अश्या वेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिलेली विनयशीलता आणि आदर हीच सर्वोत्तम भेट आहे असे प्रतिपादन मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ. अब्दुस सलाम सर यांनी केले. मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलीत सावित्रीबाई फुले उर्दु प्राथमिक कन्या शाळा, मौलाना आझाद उर्दु मुलींचे हायस्कुल, मदर तेरेसा उर्दु ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स ॲंण्ड सायन्स् फॉर गर्ल्स, मासुमिया डी.एल.एड्. कॉलेज (उर्दू), मासुमिया शिक्षणशास्त्र महाविद्यालय, मुकुंदनगर, अहमदनगर येथे शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा.डॉ. शेख अब्दुस सलाम अब्दुल अजीज यांच्या हस्ते डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्या प्रतिमेस फुलहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुने म्हणुन अरुणा आसिफ अली, शैक्षणिक व सामाजिक महिला मंडळाच्या अध्यक्षा सय्यद फरीदा गफ्फार उपस्थित होत्या. शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी भाषण व विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले. शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रा.डॉ. शेख अब्दुस सलाम सर यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका सय्यद फरहाना, प्राचार्य डॉ. शेख मारुफ, दंडोती शकीला, तलमीज सय्यद, फरीदा जहागिरदार, प्रा. शबाना, संस्थेचे पदाधिकारी इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन तलमीज सय्यद यांनी केले.फरीदा जहागिरदार यांनी सर्वांचे आभार मानले.

*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान अहमदनगर 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
close