shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

"राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार २०२४" श्री.अमोल क्षीरसागर यांना प्रदान


प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : ४/    १सप्टेंबर २०२४ वार रविवार रोजी ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून, आशा एज्युकेशन फाउंडेशन संचलित, जय बजरंग प्राथमिक विद्यालय , पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर येथील जय बजरंग विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. अमोल क्षीरसागर सर यांना जन आरोग्यम संचलित, जाणीव फाउंडेशन आयोजित ,लोकनेते श्री.बाळासाहेब थोरात राज्यस्तरीय" आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार २०२४" प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

सरांचे शाळेतील ,संघटनेतील समाजातील शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक, संघटनात्मक काम पाहून तसेच त्यांची गुणवान विद्यार्थी घडवण्यासाठी असणारी धडपड  पाहून आणि शिक्षकांच्या अडचणीचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडवण्याची जाण लक्षात घेऊन जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.  बाळासाहेब हेंद्रे, उपाध्यक्ष अजित पाटणकर जाणीवचे कार्यवाहक श्री अंतोन मिसाळ सर, समन्वयक, संदीप काकड, सतीश गोर्डे, विजय काकड, सुनील मंडलिक, रमेश रुपवते, यांच्या माध्यमातून; कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर , संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. शंकर पाटील खेमनर,संगमनेर साखर कारखान्याचे संचालक श्री. इंद्रजीत पाटील खेमनर, श्री.जयराम शेठ ढेरंगे, गाथा परिवाराचे श्री. उल्हास पाटील, अँड श्री.किरण रोहम जिल्हाध्यक्ष एकतावादी संघटना, तसेच स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री . प्रसाद शिंदे सर, अँड दुराफे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला .

 उपस्थितांमध्ये जय बजरंग विद्यालयाचे श्री. शंकर चवलवाड सर, श्री. मकरंद हिंगे सर, श्रीमती. कल्पना मिसाळ मॅडम, श्री राहुल मोरे सर तसेच महाराष्ट्रभरातून आलेले ५१ पुरस्कारार्थी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुनील अभियेकर सरांनी केले.
close