इंदापूर विधानसभा मतदार संघासाठी तानाजी मारकड, श्रीनिवास सातपुते, नवनाथ कोळेकर,अँड दिलीप धायगुडे, यांनी केली मागणी .
राष्ट्रीय समाज पक्ष पुणे जिल्हा बुध बांधणी आढावा बैठक व संभाव्य उमेदवारांसंदर्भात आढावा बैठक संपन्न.
इंदापूर: राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्वबळावर २८८ विधानसभा लढवण्याची घोषणा केली. त्याप्रमाणे दि.२३ सप्टेंबर २०२४ रोजी - बारामती हॉटेल कृष्णसागर येथे राष्ट्रीय समाज पक्ष पुणे जिल्हा बुध बांधणी आढावा बैठक व संभाव्य उमेदवारांसंदर्भात आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते व मुख्य महासचिव माऊली सलगर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी इंदापूर , बारामती विधानसभा मतदार संघातील बुध बांधणी आढावा बैठक व विधानसभा सभा निवडणूक-२०२४ संदर्भात सखोल चर्चा झाली.
यावेळी बारामती व इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली.यामध्ये बारामती- संदिप चोपडे, महादेव कोकरे, इंदापूर-तानाजी मारकड, श्रीनिवास सातपुते, नवनाथ कोळेकर,अँड दिलीप धायगुडे, यांनी मागणी केली.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अँड संजय माने युवक अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अजित पाटील, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख तानाजी शिंगाडे, जिल्हाध्यक्ष किरण गोफने, संदिप चोपडे, विनायक रूपनवर, बारामती तालुका अध्यक्ष अँड अमोल सातकर, अविनाश मोहिते, शहाजी भाळे,महादेव कोकरे, विठ्ठल देवकाते,बुरूगले मामा,सोमनाथ पांढरमिसे, बजरंग वाघमोडे, गणेश हेगडकर, तात्याराम मारकड, आण्णा नरूटे, विठ्ठल काळे,व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.